Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड खूपच बदललीय ‘लगान’ सिनेमातील ‘गोरी मेम’, चित्रपटात पडली होती आमिर खानच्या प्रेमात

खूपच बदललीय ‘लगान’ सिनेमातील ‘गोरी मेम’, चित्रपटात पडली होती आमिर खानच्या प्रेमात

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या कारकिर्दीतील प्रचंड गाजलेला आणि सर्वोत्तम चित्रपट ‘लगान‘ आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अनेक कलाकारांनी आपल्या जबरदस्त भूमिका बजावल्या. त्यापैकीच एक असलेली अभिनेत्री रचेल शेली ही ‘एलिझाबेथ रसेल’ शेलीच्या भूमिकेत दिसली होती. एलिझाबेथ रचेलच्या मदतीनेच आमिर आणि त्याच्या संघाने सामना जिंकला होता. मात्र, ती कुठे आहे आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर २० वर्षांनी ती कशी दिसते?, हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. तिचा एक लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो चाहत्यांना खूप आवडत आहे.

युजर्स काय म्हणाले?
सध्या अभिनेत्री रचेल शेली (Rachel Shelley) हिचा एक फोटो इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो तिच्या एका फॅन पेजने शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने टॉपसह एक जॅकेट घातले आहे. हे पाहून युजर्स ती १६ वर्षांच्या किशोरवयीन मुलीसारखे दिसत असल्याचे म्हणात आहेत.

चाहते उत्स्फूर्तपणे करत आहेत कमेंट्स
सोशल मीडियापासून दूर राहणाऱ्या रचेलच्या या व्हायरल फोटोवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. या पोस्टवर अनेकांनी इमोजी शेअर करून कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. त्यासह तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण असल्याचे अनेकांनी सांगितले. अनेकांनी तिने  साकारलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे आणि चाहत्यांनी तिला हिंदी चित्रपटात काम करताना बघायचे आहे, असेही म्हटले आहे.

चाहत्यांच्या हृदयावर सोडली छाप
जवळपास २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रचेलने तिच्या व्यक्तिरेखेने वेगळी छाप सोडली होती. या चित्रपटात तिने दमदार अभिनय केला होता, ज्यावर प्रेक्षकही फिदा झाले होते.

हेही पाहा- कोणी पैश्यांसाठी तर कोणी प्रेमासाठी घेतला प्रसिद्ध अभिनेत्रींचा जीव

‘या’ चित्रपटांमध्ये केले आहे काम
‘लगान’मधून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री रचेल शेलीने हॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयासाठी तिला ऑस्करसाठी नामांकनही मिळाले होते. ‘द एल वर्ड’ या हॉलिवूड सीरिजसाठी ती ओळखली जाते. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक मॉडेल आणि लेखिका देखील आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा