बॉलिवूडमधील स्टारकिड हे मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनत असतात. नेहमीच अनेक स्टारकिडचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेचा विषय बनत असतो.
बॉलिवूडच्या सर्व स्टारकिडपैकी तैमूर सर्वात लोकप्रिय ठरला आहे. बेबोचा दुसरा मुलगा ‘जहांगीर अली खान’ म्हणजेच तैमूरचा छोटा भाऊ हा देखील सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. जेहचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. दोघेही भाऊ घराबाहेर पडताच कॅमेरेमॅन त्यांच्या मागेच असतात आणि त्यामुळेच त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तैमूरच्या जन्मापासूनच तो एक स्टार बनला आहे आणि त्याच्या पाठोपाठ आता जेह देखील स्टारकिडपैकी एक लोकप्रिय स्टारकिड बनला आहे. सध्या सोशल मीडियावर भावाच्या या जोडीची बरीच चर्चा आहे. तैमूर आणि जेह यांची एक झलक घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात.
रविवार (३० ऑगस्ट) रोजी दोन्ही गोंडस भावांची जोडी त्यांच्या बांद्रा येथील घराखाली दिसली. तैमूर मित्रांसोबत खेळताना दिसला. जेहला सांभाळत असलेल्या आयाने त्याला उचलून घेतले होते. या दरम्यान, तैमूर त्याच्या खेळण्यामध्ये मग्न दिसला. तो त्याच्या खेळण्यातील छोटी कार चालवताना दिसत होता. तैमूरने फिकट निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि गुलाबी पँट घातली आहे आणि यात तो नेहमीप्रमाणे अतिशय गोड दिसत आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. चाहते देखील त्यांच्या या फोटोंना खूप पसंती देत आहेत.
दरम्यान, अलीकडेच करीना मालदीवमध्ये सुट्ट्या एंजॉय करून कुटुंबासह मुंबईत परतली आहे. तेव्हा तिने आपल्या लाडक्या मुलाला माध्यमांपासून लपवण्याऐवजी मीडियासाठी उघडपणे पोझ देत फोटो शेअर केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका
-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश
-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ