Wednesday, July 3, 2024

जाणून घ्या कोण आहे हा सर्वांत छोटा दिसणारा क्यूट गायक? गंभीर आजारामुळे झालीय ‘ही’ स्थिती

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एआर रहमान (AR Rehman) यांची मुलगी खतिजा हिच्या रिसेप्शन पार्टीतील एका लहान आणि गोंडस मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पार्टीचे फोटो समोर आल्यापासून, नेटकऱ्यांना या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती. हे पाहून अल्पावधीतच ही गोंडस व्यक्ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. आम्ही बोलत आहोत, ताजिकिस्तानच्या अब्दू रोजिकबद्दल (Abdu Rozik), जो आजकाल आपल्या गाण्यांमुळे आणि क्यूट लुक्समुळे खूप चर्चेत आहे.

ताजिकिस्तानमधील ही व्यक्ती त्याच्या देशात गाण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. पण आता या गायकाने संपूर्ण जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगातील सर्वात छोटा गायक होण्याचा विक्रम अब्दू रोजिकच्या नावावर आहे. लूक व्यतिरिक्त त्याने आपल्या रॅप गाण्यानेही संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचे ‘ओही दिली जोर’ हे गाणे जगभरातील लोकांना खूप आवडले आहे. (who is abdu rozik know more details about world smallest singer)

अवलोड मीडिया या यूट्यूब चॅनलवर त्याचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत, ज्यांना लोकांनी खूप पसंती दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, छोटा दिसणारा हा गायका १८ वर्षांचा आहे. त्याच्या जन्मतारखेबद्दल कोणतीही अचूक माहिती उपलब्ध नाही. परंतु काही अहवालांनुसार, त्याचा जन्म २००४ मध्ये ताजिकिस्तानच्या डिशदारवा गावात झाला होता.

काही रिपोर्ट्सनुसार, बालपणातील एका आजारामुळे या गायकाची उंची वाढू शकली नाही. लहान वयातच त्याला रिकेट्स नावाच्या आजाराचे निदान झाल्याचे सांगितले जाते. हिंदीत याला शुष्क रोग असेही म्हणतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने, त्याला वेळेवर योग्य उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे त्याची उंची कायमची थांबली. या आजारामुळे मुलांच्या हाडांचा विकास थांबतो, तसेच हाडे कमकुवत होतात. व्हिटॅमिन डीची कमतरता, हे सामान्यतः या आजाराचे कारण मानले जाते.

लहानपणी इतकं दु:ख सहन करणारा अब्दू आज संपूर्ण जगात खूप प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध ताजिक ब्लॉगर आणि रॅपर बॅरन हे पहिले होते, ज्यांनी त्याची प्रतिभा ओळखली आणि त्याला आर्थिक मदत केली. आज या गायकाचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावरही तो खूप प्रसिद्ध आहे. इन्स्टावर त्यांचे २६ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, जे त्याच्या आवडत्या गायकाच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतीच तो सलमान खानसोबत दिसला होता. या भेटीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा