Monday, July 1, 2024

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ म्हणणारे नदाव लॅपिड आहे तरी काेण? जाणून घ्या

विवेक अग्निहाेत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 2022मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा उल्लेख आवर्जुन केला जाताे. या चित्रपटाचे सर्वत्र काैतुक करण्यात आले. मात्र, आता हा चित्रपट वेगळ्यात कारणांमुळे चर्चेत आला आहे. इफ्फीचे ज्युरी हेड नदाव लॅपिड यांनी केलेल्या टिकेमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे.

गोव्यातील पणजी येथे सुरु असलेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इस्त्रायलच्या चित्रपट दिग्दर्शकाने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर जोरदार टीका केली. नदाव लॅपड (nadav laapid) म्हणाले की, “काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण व्यथित आणि त्रस्त आहोत. हा चित्रपट आम्हाला व्हलगर तसंच प्राेपगंडा करणारा वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर खुलेपणाने मांडू शकतो. ही चर्चा या मंचावर होणं गरजेचं आहे.” केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत नदाव यांनी ही टीका केली.

नदाव लॅपिडच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. नदावच्या या वक्तव्यामुळे ‘द काश्मीर फाइल्स’ आणि त्याच्याशी संबंधित कलाकार पुन्हा चर्चेत आले आहेत. आपण चित्रपटाचे कलाकार आणि निर्मात्यांला तर ओळखताेच, परंतु तुम्हाला नादव लॅपिड यांच्याबद्दल माहिती आहे का? चला, तर मग त्यांच्या विषयी जाणून घेऊया…

इस्रायलमधील तेल अवीव येथील नदाव लॅपिड रहिवासी आहे. नदाव लॅपिड एक इस्रायली पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहे. त्यांनी इस्रायली सैन्यात काम केले आहे. लष्करी सेवेनंतर, त्यांनी जेरुसलेममधील सॅम स्पीगल फिल्म आणि टेलिव्हिजन स्कूलमधून पदवी प्राप्त केली आणि यानंतर ते पॅरिसला गेले.

नदाव यांचा पहिला फिचर फिल्म ‘पोलिसमॅन’ यांने 2011 मध्ये लोकार्नो येथे स्पेशल ज्युरी पारितोषिक जिंकले. त्यांना फ्रान्सचा प्रतिष्ठित ‘फ्रेंच ऑर्डर शेवेलियर डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस’ पुरस्कार मिळाला आहे. लॅपिड हे 2015 मध्ये झालेल्या लॉरकॅनो फिल्म फेस्टिव्हलचे गोल्डन लेपर्ड ज्युरी मेंबर देखील होते. तसेच लॅपिड यांनी 2016 मधील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही आंतरराष्ट्रीय ज्युरी म्हणून काम केले, तर 2021 मध्ये झालेल्या 71 व्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल महोत्सवातही त्यांनी ऑफिशियल कॉम्पिटिशन ज्युरीची भूमिका पार पाडली होती. (who is nadav laapid remark on the kashmir files nadav laapid profile)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुखापतीतून सावरल्यानंतर शिल्पाने ठेवले जिममध्ये पाऊल, शेअर केला भन्नाट व्हिडिओ

प्रेमासमाेर नतमस्तक! ‘या’ स्टार्सनी लग्नासाठी चक्क धर्मच टाकला बदलून, पाहा यादी

हे देखील वाचा