अक्षय कुमार हा इंडस्ट्रीमधला सर्वात फिट आणि प्रामाणिक अभिनेता म्हणून ओळखला जातो. कोणाच्याही पाठिंब्याशिवाय आणि मदतीशिवाय अक्षयने स्वबळावर त्याने नाव आणि साम्राज्य उभे केले आहे. प्रतिभावान कलाकार असण्यासोबतच अक्षय एक उत्तम आणि शिस्तप्रिय माणूस म्हणून देखील ओळखला जातो. वयाची पन्नासी पार केलेला अक्षय आजही अगदी पंचविशीतला वाटतो. याचे मुख्य कारण म्हणजे त्याने स्वतःला लावलेली योग्य शिस्त. अक्षय आजही सकाळी लवकर उठून त्याचा व्यायाम करतो आणि रात्री ९ वाजता तो झोपायला देखील जातो.
बॉलिवूडमध्ये रोज अनेक मोठमोठ्या पार्ट्या होत असतात. या पार्ट्यांचे अनेक फोटो आणि बातम्या मीडियामध्ये येतात. मात्र अजूनपर्यंत एकदाही अक्षय अशा पार्ट्यांमध्ये दिसला नाही. याबद्दल त्याला अनेकदा विचारले जाते. मात्र आता यावर आधारितच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कपिल शर्मा शो मध्ये जेव्हा अक्षय सोनाक्षी, कीर्ती, तापसी यांच्यासोबत त्याचा ‘मिशन मंगल’ हा सिनेमा प्रमोट करायला आला होता, हा व्हिडिओ तेव्हाचा आहे.
या व्हिडिओमध्ये कपिल अक्षयला विचारतो की, “अक्षय पाजी तुम्ही इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या पार्ट्यांना का जात नाही? जर तुम्ही गेलात तर तुम्हालाही त्या लोकांना पार्टी द्यावी लागेल आणि खर्च करावा लागेल. मग खर्च वाचावा म्हणून तुम्ही पार्ट्याना जात नाही का?” कपिलच्या या प्रश्नाला उत्तर देताना अक्षय ‘हो’ म्हणाला आणि उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला.
मात्र खरे कारण असे आहे, की अक्षयला पार्ट्या बिलकुल आवडत नाही. तो एक कौटुंबिक व्यक्ती आहे. त्याला जर वेळ मिळालाच तर तो पार्ट्याना जाण्यापेक्षा परिवारासोबत राहणेच जास्त पसंत करतो. शिवाय त्याला जास्त जागरण अजिबात आवडत नाही. झोप त्याला खुपच प्यारी असल्याने तो लेट नाईट पार्ट्याना हजेरी लावत नाही. चुकून तो एखाद्या पार्टीला दिसलाच तर तो ९ वाजायच्या आत तिथून निघतो. (why akshay kumar does not attend bollywood parties)
मोठा कलाकार असूनही तो त्याचे जीवन एकदम शिस्तबद्ध पद्धतीने जगतो, म्हणूनच तो वयाच्या ५३ वर्षात देखील एवढा फिट आणि हँडसम आहे. त्याच्या चित्रपटांबद्दल सांगायचे झाले, तर तो आगामी काळात ‘रक्षा बंधन’, ‘बच्चन पांडे’, ‘पृथ्वीराज’, ‘राम सेतु’ या चित्रपटांत दिसणार आहे. तर पुढच्या महिन्यात अक्षयचा बहुप्रतिक्षेत ‘बेलबॉटम’ सिनेमा प्रदर्शित होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खूपच बदललीय ‘लगान’ सिनेमातील ग्रेसी सिंग; २० वर्षांनंतर अशी दिसतेय आमिर खानची अभिनेत्री
-‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉयने केले बेडरूममधील फोटो शेअर; कातिलाना अंदाजाने चाहते घायाळ