Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

सासर आणि पती सोडून आई-वडिलांसोबत का राहते अमिताभ बच्चन यांची मुलगी? ‘हे’ आहे कारण

हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे आजही लाईमलाईटमध्येच असतात. इतकेच नव्हे, तर त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि पत्नी जया बच्चनदेखील लाईमलाईटमध्ये असतात. मात्र, त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा ही लाईमलाईटपासून दूर राहते. असे असले, तरीही ती तेव्हा चर्चेत आली होती, जेव्हा तिने डिझायनर मोनिशा जयसिंगसोबत आपले फॅशन लेबल एमएक्सएस लाँच करून फॅशनच्या जगात पाऊल ठेवले होते. आता चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की, श्वेता आपल्या सासरी आणि पती निखिल नंदासोबत न राहता मुंबईत आपल्या आई-वडिलांसोबत का राहते?

श्वेता बच्चन नंदा (Shweta Bachchan Nanda) नक्कीच तिच्या सासर आणि पतीपासून दूर राहते, परंतु याचा अर्थ असा नाही की, तिने तिच्या पतीला घटस्फोट दिला आहे किंवा त्यांच्याशी काही समस्या आहेत. खरं तर, श्वेता आणि तिचा पती निखिल नंदा वेगवेगळ्या व्यवसायातून आलेले आहेत, त्यामुळे दोघांना वेगळे राहावे लागले आहे. एवढेच नाही, तर निखिल नंदा हे एस्कॉर्ट ग्रूपचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. दुसरीकडे श्वेता नंदा लेखिका, फॅशन डिझायनर आणि मॉडेल आहे.

श्वेताला नेहमीच स्वावलंबी व्हायचे होते, त्यामुळे ती पतीच्या पैशावर अवलंबून राहत नाही. तिच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, पण असे असतानाही ती काम करते आणि स्वतःच्या पैशाने मुलांचा सांभाळ करते. श्वेताचे लग्न अगदी लहान वयात झाले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, श्वेताने वयाच्या २१ व्या वर्षी लग्न केले आणि आपले आयुष्य आनंदी करण्यासाठी तिने सर्व गोष्टींचा त्याग केला होता. मात्र, लग्नानंतर दहा वर्षांनी तिने स्वत:ची कारकीर्द घडवायची ठरवले. त्यासाठी तिला दिल्लीहून मुंबईत शिफ्ट व्हावे लागले.

तिचे आई-वडीलही मुंबईतच राहतात. त्याच शहरात असल्याने, श्वेता प्रत्येक लहान-मोठ्या प्रसंगी आपल्या आई- वडिलांच्या ‘जलसा’ या बंगल्यामध्ये आपली उपस्थिती नोंदवते. म्हणजेच श्वेता बच्चनने पतीला घटस्फोट दिलेला नाही. ती तिचा नवरा आणि सासरच्या लोकांसोबत खूप आनंदी आहे.

इतकेच नव्हे, तर तिचे आई-वडील आणि सासरच्या लोकांशी चांगले संबंध आहेत. श्वेताच्या म्हणण्यानुसार, “भारतीय समाजात अशी प्रतिमा आहे की, जेव्हा एखादा मुलगा त्याच्या आई-वडिलांच्या घरी येतो, तेव्हा त्याला सभ्य समजले जाते. जेव्हा एखादी मुलगी तिच्या पालकांच्या घरी जाऊ लागते, तेव्हा लोकांना वाटते की, तिचे लग्न तुटले आहे, त्यामुळे तिला तिच्या पालकांसोबत राहण्यासाठी परत यावे लागेल.”

श्वेताला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव अगस्त्य नंदा आहे, तर मुलीचे नाव नव्या नवेली नंदा आहे. नव्या ही इतर तीन महिलांसोबत एक कंपनी चालवते. तिच्या कंपनीचे नाव ‘आरा हेल्थ’ असे आहे. ही महिला-केंद्रित आरोग्य तंत्रज्ञान कंपनी आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा