हिंदी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी हातावर मोजता येतील इतक्याच चित्रपटात काम केले, मात्र आपल्या कसदार अभिनयाने एक वेगळी छाप त्यांनी या क्षेत्रात पाडली. या अभिनेत्रींमध्ये नम्रता शिरोडकर हे नाव प्रामुख्याने घेतल जात. तिने आपल्या अभिनयाच्या जादूने आणि सौंदर्याने चित्रपटक्षेत्रात तिची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
नम्रता शिरोडकरने (namrta shirodkar) अभिनय क्षेत्रातील आपल्या छोट्याशा कारकिर्दीत प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. सलमान खानसोबत ‘जब प्यार किसी से होता है,’ त्याचबरोबर अनिल कपूरच्या ‘पूकार’ आणि संजय दत्तसोबत ‘वास्तव’ अशा मोजक्याच चित्रपटातून तिने लोकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र अवघ्या ६ वर्षात तिला चित्रपटक्षेत्रापासून दूर जावे लागले.
नम्रताचा जन्म २२ जानेवारी १९७२ ला मुंबईमध्ये एका मराठी कुटुंबात झाला होता. आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. यामध्ये बराच संघर्ष केल्यानंतर तिने १९९३ मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब आपल्या नावावर केला. इथूनच तिच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दिचा श्रीगणेशा झाला. सलमान खानसोबत १९९८ मध्ये तीने जब ‘प्यार किसी से होता है’ हा पहिला चित्रपट केला. ट्विंकल खन्ना आणि सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी नम्रताला मात्र यानंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या याचवेळी तीची एंट्री ‘वामसी’या तेलुगू चित्रपटात झाली आणि इथेच तिला अभिनेता महेश बाबू भेटला.
या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नम्रता आणि महेश बाबू यांच्यामध्ये जवळीक वाढत गेली आणि चित्रपटाच शूटिंग पूर्ण होता होता दोघांच्यात प्रेमाचे नाते तयार झाले होते. यामुळेच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याआधी महेश बाबूंनी तिच्यापूढे एक अट ठेवली होती. यावेळी महेशबाबूंनी नम्रताला लग्नानंतर चित्रपटात काम न करता घराकडे पूर्णवेळ लक्ष देण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करत नम्रताने २००५ मध्ये महेश बाबूसोबत विवाह केला. त्यानंतर ती आपल्या घरकामात व्यस्त होउन आपोआपच सिनेसृष्टीपासून दूर गेली. त्यांना गौतम आणि सितारा अशी दोन मुलेही आहेत. दरम्यान नम्रताने आपल्या कारकिर्दित अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. १९९३ मध्ये तिने ‘मिस इंडिया’ सह ‘मिस यूनिवर्स’ चाही किताब आपल्या नावावर केला होता.
हेही वाचा :
- ‘या’ आहेत ‘पुष्पा’ चित्रपटातील पाच मोठ्या चुका, प्रेक्षकांना काय पण अगदी निर्मात्यांच्याही आल्या नाहीत ध्यानात
- अरबाज खानच्या गर्लफ्रेंडलाही आवरला नाही ‘सामी सामी’वर थिरकायचा मोह! शेअर केला भन्नाट व्हिडिओ
- बऱ्याच काळापासून पडद्यापासून दूर असलेले अरुण बाली ‘या’ दुर्मिळ आजाराने ग्रस्त, रुग्णालयात करण्यात आले दाखल