Sunday, July 14, 2024

बऱ्याच काळापासून पडद्यापासून दूर असलेले अरुण बाली ‘या’ दुर्मिळ आजाराने ग्रस्त, रुग्णालयात करण्यात आले दाखल

टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये दीर्घकाळ अभिनय करणारे अभिनेता अरुण बाली (Arun Bali) अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहेत. त्यांचे चित्रपटांपासून दूर राहण्याचे कारण आता समोर आले आहे. खरं तर ते एका आजाराने ग्रस्त आहेत. ते सध्या रुग्णालयात दाखल असून, त्यांना बोलण्यात खूप अडचणी येत आहेत. ७९ वर्षीय अरुण बाली हे मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाच्या न्यूरोमस्क्युलर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, त्यांचे कुटुंब त्यांची लवकरात लवकर घरी परतण्याची वाट पाहत आहे.

CINTAAच्या सदस्या नुपूर अलंकार, ज्या त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतात. त्या अरुण बाली यांच्याशी फोनवर बोलत असताना त्यांच्या लक्षात आले की, अभिनेत्याच्या आवाजात काही समस्या आहे. माध्यमांशी केलेल्या संभाषणात, नुपूर म्हणाल्या, “मी अरुण बाली सरांशी फोनवर बोलत होते, जेव्हा मला वाटले की त्यांच्या आवाजात काहीतरी चूक आहे, जी मी त्यांना सांगितली. त्यानंतर मी त्यांचा मुलगा अंकुश याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. मग मी राजीव मेननला फोन केला जो अंकुशचा सहकारी आहे. त्याचा दुसरा नंबर आला आणि मी त्याला अरुण सरांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला.” (veteran actor arun bali diagnosed with rare neuromuscular disease admitted to hospital)

अरुण बालींच्या मुलीने नंतर नुपूर यांना कळवले की, त्यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिसचे निदान झाले आहे. हा एक दुर्मिळ ऑटोइम्यून रोग आहे जो तंत्रिका आणि स्नायूंच्या समन्वयामध्ये अडथळा आणतो. आपली चिंता व्यक्त करताना नुपूर पुढे म्हणाल्या, “आज मला अरुणजींच्या नंबरवरून फोन आला. ते स्पष्टपणे बोलू शकत नव्हते. त्यांची मुलगी इतिश्रीने मला त्यांची अवस्था सांगितली. मी खरोखर काळजीत आहे. मी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते.”

अरुण बाली यांची कारकीर्द
अभिनेता अरुण बाली यांनी अनेक टेलिव्हिजन शो केले आणि अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणूनही काम केले. त्यांच्या टीव्ही शोमध्ये ‘चाणक्य’, ‘कुमकुम’, ‘स्वाभिमान’ आहेत. याशिवाय जर चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी ‘३ इडियट्स’, ‘केदारनाथ’, ‘ओह माय गॉड’, ‘पानिपत’, ‘मनमर्जियां’, ‘पीके’ आणि ‘बर्फी’ सारख्या ४० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

‘रणबीर कपूर म्हणत असेल, धन्यवाद देवा ब्रेकअप केला’, ‘गेहेराईयाचा’ ट्रेलर पाहून केआरकेने उडवली दीपिकाची खिल्ली

महाराष्ट्राची कन्या बनली हैदराबादची सून, नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची अनोखी लव्हस्टोरी | HBD Namrata Shirodkar

नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसची सिझलिंग केमेस्ट्री, व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

हे देखील वाचा