Tuesday, July 23, 2024

अरबाज खानच्या गर्लफ्रेंडलाही आवरला नाही ‘सामी सामी’वर थिरकायचा मोह! शेअर केला भन्नाट व्हिडिओ

‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटातील ‘सामी सामी’ हे गाणे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. या गाण्यामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने (Rashmika Mandanna) धमाकेदार डान्स केला आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडिओ बनवले आहेत. अशातच, आता अरबाज खानची (Arbaaz Khan) गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीनेही (Giorgia Andriani) या गाण्यावर असा डान्स केला आहे की, ते पाहून चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत.

लाल साडी घालून लावले जोरदार ठुमके
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जॉर्जिया लाल रंगाची साडी परिधान करून, ‘सामी सामी’ गाण्यावर नाचत आहे. यात तिने रश्मिका मंदान्नाच्या डान्स स्टेप्स हुबेहुब कॉपी केल्या आहेत. जॉर्जियाने या गाण्यावर असे मुव्ह्ज दाखवले आहेत, जे पाहून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकला आहे. हा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून, कमेंट सेक्शनमध्ये चाहते त्याचे कौतुक करत आहेत. (arbaaz khan girlfriend giorgia andriani wears red saree and dance on saami song)

दिले भन्नाट कॅप्शन!
जॉर्जिया एंड्रियानीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “तुझी नजर घेऊन जाईल?” यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “काय दिसतेय! पूर्ण रेड वेलवेटचा केक वाटत आहेस.” दुसर्‍याने लिहिले, “नजर लागली आय हाय.” एकाने लिहिलंय, “तू आग लावलीस.” या व्यतिरिक्त चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये भरपूर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केले आहेत. तसेच या व्हिडिओला प्रचंड लाइक आणि शेअर केले जात आहे.

अरबाज खानला करतेय डेट
अरबाज खान त्याची पत्नी मलायका अरोराशी (Malaika Arora) घटस्फोट घेतल्यानंतर जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. या जोडप्याच्या वयात २२ वर्षांचे अंतर आहे. जॉर्जिया ३० वर्षांची आहे आणि अरबाज खान ५२ वर्षांचा आहे. दोघेही अनेकदा कार्यक्रमात किंवा पार्टीत एकत्र स्पॉट केले जातात.

तसेच, जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करते, जे चाहत्यांना खूप आवडतात. यामुळेच इंस्टाग्रामवर तिचे भलेमोठे फॉलोव्हर्स आहे. मात्र ती स्वतः ३२३ लोकांनाच फॉलो करते.

हेही वाचा :

‘रणबीर कपूर म्हणत असेल, धन्यवाद देवा ब्रेकअप केला’, ‘गेहेराईयाचा’ ट्रेलर पाहून केआरकेने उडवली दीपिकाची खिल्ली

महाराष्ट्राची कन्या बनली हैदराबादची सून, नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची अनोखी लव्हस्टोरी | HBD Namrata Shirodkar

नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसची सिझलिंग केमेस्ट्री, व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

हे देखील वाचा