Sunday, December 15, 2024
[aioseo_breadcrumbs]

लग्नापूर्वी दिशाच्या रूमबाहेर ‘मेरी दुल्हन कहा है’, म्हणत ओरडताना दिसला राहुल; नववधू बाहेर येताच…

मागील अनेक दिवसांपासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या लग्नाचीच चर्चा होती. त्यांचे लग्नाआधीचे सर्व विधी साग्रसंगीत पार पाडल्यानंतर आज शुक्रवार (१६ जुलै) रोजी राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचा लग्नसोहळा धुमधडाक्यात पार पडला आणि ते एकमेकांचे झाले.

या दोघांच्या लग्नाचे आणि आधी झालेल्या सर्व विधींचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आज त्यांच्या लग्नाच्या दिवसाचे अनेक व्हिडिओ आज आपल्याला पाहायला मिळत आहे. यातलाच एक व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. यात राहुल त्याच्या ऑफ व्हाइट रंगाचा शेरवानी आणि कुर्ता घालून नवरदेवाच्या वेशात तयार होऊन त्याच्या बॉईज गँगसोबत ‘मेरी दुल्हन कहा है’ असे ओरडताना दिसत आहे.

असे ओरडत असतानाच आपल्या रूममधून दिशा पडदा सरकवून नववधूच्या वेशात ती राहुल समोर येते आणि राहुल तिला बघतच राहतो. लाल रंगाच्या जोड्यात दिशा अतिशय सुंदर दिसत होती. राहुल तिच्या जवळ जात तिला न्याहाळताना  दिसतो. त्या दोघांना पाहून सर्वजण जोरजोरात ओरडत आहेत.

त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, फॅन्सच्या त्यांना भन्नाट कमेंट्स येत आहे. राहुल आणि दिशाचा हा भव्य लग्न सोहळा मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये संपन्न झाला.

लग्नाच्या इतर व्हिडिओंमध्ये राहुल गुडघ्यावर बसून दिशाच्या बोटात अंगठी घालताना दिसत आहे, तर एका व्हिडिओमध्ये ते दोघे एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. त्यांचे कुटुंबीय दिशा आणि राहुलवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्विमिंग पूलच्या कडेला मोनालिसाने दिल्या घायाळ करणाऱ्या पोझ; पाहून वाढतील तुमच्याही हृदयाचे ठोके

-शुभमंगल सावधान!!! राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले विवाहबंधनात; लग्नसोहळ्याचे खास फोटो आले समोर

-आदिल खानसोबत जोरदार ठुमके लावताना दिसली शिल्पा शेट्टी; ‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरचा धमाल परफोर्मेंस होतोय व्हायरल

हे देखील वाचा