अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील ती मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. या वर्षी तिच्या अनेक चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोनालीने नुकतेच दुसऱ्यांदा लग्न केले आहे. तिने तिचा पती कुणाल बेनोडेकरसोबतच लग्न केले आहे. मागील वर्षी लॉक डाऊनमध्ये त्यांनी अगदी साध्या पद्धतीने लग्न केले.
सोनाली सध्या मेक्सिकोमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. पतीसोबत लग्न झाले तरी देखील सोनाली तिचे एकटीच फोटो पोस्ट करत आहेत. यावर युजरने निशाणा साधला आहे आणि तिला अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. सोनालीने सध्या अनेक हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जे काहींना खूप आवडले आहेत तर काही मात्र तिला ट्रोल करत आहेत.
सोनालीने हे फोटो शेअर केल्यानंतर एका युजरने तिला प्रश्न विचारला आहे की, ती तिच्या नवऱ्यासोबत फोटो का नाही टाकत? तसेच ती कधी नवऱ्यासोबत फोटो पोस्ट करणार आहे. यावर सोनालीने लवकरच अशी कमेंट केली आहे. त्यामुळे आता सोनाली आणि तिच्या नवऱ्याचे फोटो बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत.
सोनालीने या वर्षी अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तिने ‘पांडू’,(pandu) ‘झिम्मा’ (jhimma),’तमाशा लाईव्ह’, ‘व्हीकटोरीया’ या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वतःचाच “त्या” सिनेमातील अभिनय पाहून दुखावलेल्या सतीश शाह यांनी ‘या’ कारणासाठी सोडले अभिनय क्षेत्र?
परी म्हणू की सुंदरा! कान्समध्ये साराच्या ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष, फाेटाे व्हायरल