Wednesday, June 26, 2024

तापसी पन्नू-स्वरा भास्करला का म्हटलं होतं ‘बी ग्रेड’? अखेर कंगनाने सांगितलं कारण; म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमी तिच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती बॉलिवूडमधील नेपोटिझम आणि माफियाबद्दल उघडपणे बोलत आहे. याचबरोबरच ती तिची राजकीय मतंदेखील परखडपणे मांडत असते. याबरोबरच चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांबद्दलही कंगना भाष्य करताना आढळते. त्यामुळे ती वादच्या भोवऱ्यात अडकत असते. नुकतेच तिने तापसी पन्नू आणि स्वरा भास्करवर टीका केली होती. तिने या दोन्ही अभिनेत्रींना ‘बी ग्रेड’ अभिनेत्री म्हंटले होते. या वक्तव्यानंतर बरीच खळबळ उडाली होती. 

आता कंगनाने या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. तिने सांगितले की, तापसी आणि स्वरा यांच्या वक्तव्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. या वक्तव्याने तिच्या करिअरवर परिणाम झाला होता. त्यामुळे तिने असं वक्तव्य केलं होतं. कंगना म्हणाली, “तापसी एकदा म्हणाली होती की, मला मुखवट्यांची गरज आहे. त्यावेळी ती स्वतः प्रचंड संघर्ष करत होती. 2016 मध्ये तिला प्रथम यश मिळाले. त्यावेळी तिने माझ्याबद्दल असं वक्तव्य केलं होतं अन् त्यावर माझ्या बहिणीने तिला उत्तर दिलं होतं.”

“आज त्या दोघींचं करिअर खरंतर माझ्यामुळेच सुरू आहे आणि यश मिळालं आहे. त्यामुळे त्यांना माझ्याबद्दल वक्तव्य करायला नको होतं. माझ्या बहिणीने त्यांना उत्तर दिलं खरं पण मी मात्र त्यांना फारशी किंमत दिली नाही. त्यांना मिळालेलं यश पाहून मी खुश आहे.” असं ही कंगणा म्हणाली. कंगनाचा आगामी चित्रपट ‘तेजस’ 27 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

स्वरा बास्करबद्दल बोलताना कंगना म्हणाली, ‘तनु वेड्स मनू दरम्यान आम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होतो. ती दिवसभर माझा हात धरून हिंडत असे. मी एकदा तिची हेअरस्टाईलही केली होती. पण नंतर अचानक तिला माझ्यासोबत अडचणी येऊ लागल्या. जे लोक फारच उदार आणि सहिष्णू होतात, त्यांना इतरांचे विचार आवडत नाहीत. कदाचित तिच्यासोबत तेच झालंय.’ तिच्या या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. (Why Taapsee Pannu-Swara Bhaskar was called B Grade Kangana finally told the reason)

आधिक वाचा-
दोन ‘सिंगल’ मिळून करणार सुपर धमाल; अभिनयच्या प्रेमाच्या आड प्रथमेश येत असेल? एकदा नक्की वाचा
‘तुमची आठवण…’ लक्ष्मीकांत बेर्डेंच्या वाढदिवसानिमित्ताने लेकीची भावुक पोस्ट; चाहते म्हणाले, ‘लक्ष्या मामा…’

हे देखील वाचा