Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड कॅटरिना कैफ अन् विक्की कौशल लवकरच लग्न करणार?? सलमान खानचा स्टायलिस्ट एशले रेबेलोकडून मिळाले संकेत

कॅटरिना कैफ अन् विक्की कौशल लवकरच लग्न करणार?? सलमान खानचा स्टायलिस्ट एशले रेबेलोकडून मिळाले संकेत

बॉलिवूडची ‘बार्बी डॉल’ अशी जीची ओळख आहे, त्या कॅटरिना कैफला शुक्रवारी (१६जुलै) तिच्या चाहत्यांनी आणि मित्रांनी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यात कॉस्च्युम डिझायनर आणि सलमान खानचा स्टायलिस्ट एशले रेबेलो याने देखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डिझायनरने ‘भारत’ या चित्रपटाच्या सेटवरील कॅटरिनाचा एक जुना फोटो इंस्टाग्राम शेअर केला. यात ती ऑनस्क्रीन लग्नाच्या पांढऱ्या गाऊनमध्ये दिसत आहे. यावर त्याने असे म्हटले आहे की, त्याला आशा आहे की, रील लाईफ वेडिंग सिक्वेंस लवकरच रियॅलिटीमध्ये बदलेल.
(Will katrina kaif and vicky kaushal get married soon, Salman Khan’s stylish Ashley rebello hints)

हे वाचून कॅटरिनाचे चाहते उत्साहित झाले आहेत. ते असा अंदाज लावत आहे की, कॅटरिना आणि विक्की कौशल यांच्या लग्नाचे हे संकेत असावेत. कॅटरिना आणि विक्कीच्या रिलेशनबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत, परंतु त्या दोघांनी या बाबत अजून कोणतीही माहिती दिली नाही. त्याने इंस्टा स्टोरीला लिहिले आहे की, “हॅप्पी बर्थ डे कॅटरिना कैफ, लवकरच हे सत्यात देखील उतरू शकते.” माध्यमांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी विक्कीला कॅटरिनाच्या अपार्टमेंटच्या बाहेर बघितले होते.

कॅटरिना आणि विक्की कौशल हे दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांसोबत स्पॉट होतात. परंतु त्यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण डिझायनरने केलेल्या या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची आशा लागली आहे. सगळेजण आता त्यांच्याकडून येणाऱ्या अधिकृत माहितीची वाट बघत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-महाकठीण! ‘या’ फोटोतील कपिल शर्माला ओळखलं का? कॉमेडियनने दिलं मजेशीर चॅलेंज

-‘या’ कलाकारांनी दिला होता ‘जेठालाल’च्या पात्रासाठी नकार; राजपाल यादवचाही आहे यादीत समावेश

-भूषण कुमार याच्यावर बलात्काराची केस दाखल; आता टी-सीरिजने वक्तव्य जाहीर करत दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

हे देखील वाचा