हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथवर (Will Smith) १० वर्षांसाठी ऑस्कर आणि इतर अकादमी कार्यक्रमांमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ८ एप्रिल रोजी ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथच्या चापट प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये त्याने होस्ट ख्रिस रॉकची (Chris Rock) चेष्टा गंभीरपणे घेतली होती आणि त्याला भर स्टेजवर सर्वांसमोर कानाखाली मारली होती.
विल स्मिथवर १० वर्षांची बंदी
अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने विल स्मिथला अकादमीच्या सर्व कार्यांवर बंदी घालण्यासाठी केलेल्या मतदानानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याच मतदानानंतर विल स्मिथवर १० वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. तथापि, स्मिथनेही आपल्या वागणुकीबद्दल माफी मागितली आणि नंतर अकादमीचा राजीनामा दिला. (will smith banned from oscars for 10 years after slapping chris rock on stage)
ख्रिस रॉकला मारली होती कानाखाली
ख्रिस रॉकने विल स्मिथच्या पत्नीच्या केसांवर (अलोपेसिया सॉल्ट रोगाने ग्रस्त) विनोद केला. त्यानंतर तो स्टेजवर पोहोचला आणि त्याने ख्रिसच्या तोंडावर एक जोरदार चापट मारली. या घटनेच्या एका तासापेक्षा कमी कालावधीनंतर, विलला त्याच्या ‘किंग रिचर्ड’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला, ज्यामध्ये त्याने प्रसिद्ध टेनिसपटू सेरेना आणि व्हीनस विल्यम्स यांच्या वडिलांची भूमिका केली होती.
विल स्मिथवर झाली कारवाई
विल स्मिथची कारवाई अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस, हे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करते. त्यांनी काल म्हणजेच शुक्रवारी झालेल्या बैठकीत या घटनेची दखल घेत त्यांनी कडक कारवाई केली. या घटनेनंतर अकादमीने होस्ट ख्रिस रॉकचेही आभार मानले, कारण त्यादरम्यान त्याने त्या चापटला अतिशय शांतपणे उत्तर दिले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा