मानलं भावा! कानाखाली मारल्यानंतर विल स्मिथने जाहीरपणे मागितली क्रिस रॉकची माफी

सोमवारी (२८ मार्च) जगातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तीन वर्षांनी पार पडत असलेला हा सोहळा या पुरस्काराच्या बातमीने नव्हेतर एका वेगळ्याच घटनेने जगभरात चर्चेत आला. विल स्मिथने(will smith) कार्यक्रमाचा निवेदक क्रिस रॉकच्या (Chris Rock) सणसणीत कानाखाली दिलेल्या बातमीची दिवसभर चर्चा झाली. मात्र आता आपली चूक लक्षात आल्यानंतर विल स्मिथने जाहीर माफी मागत एक भावनिक पत्रही क्रिस रॉकच्या नावे लिहले आहे. ज्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. या व्हायरल पत्राने स्मिथ सारख्या मोठ्या कलाकाराचा प्रामणिकपणा आणि नम्रपणा दिसून आला आहे. ज्यामुळे स्मिथवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

२८ मार्च  २०२२ रोजी पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील एका घटनेची जगभरात चर्चा रंगली होती. या कार्यक्रमात निवेदक क्रिस रॉकने अभिनेता विल स्मिथच्या पत्नीची खिल्ली उडवणारे विधान केले होते. ज्यामुळे संतापलेल्या स्मिथने थेट मंचावर जात क्रिस रॉकच्या सणसणीत कानाखाली मारली. इतकेच नव्हेतर त्याने खाली बसतानाही त्याला शिव्या दिल्या होत्या. या घटनेची दिवसभर चर्चा रंगली होती. यानंतर आता विल स्मिथने या झाल्या प्रकाराची माफी मागत क्रिसच्या नावाने एक पत्र लिहले आहे जे सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामधून स्मिथने आपला नम्रपणा दाखवला आहे.

या पत्रात तो म्हणतो की, “हिंसा कुठल्याही स्वरूपात विषारी आणि विनाशकारी असते. काल ॲकॅडमी पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमातलं माझं वर्तन अक्षम्य स्वरूपाचं होतं. माझ्यावर केले गेलेले विनोद हा माझ्यासाठी नेहमीचा भाग आहे; पण जाडाच्या आजारपणावरुन केलेला विनोद मला सहन झाला नाही आणि मी भावनिक आवेगात प्रतिक्रिया दिली.
क्रिस, मी तुझी सार्वजनिकरित्या माफी मागू इच्छितो. मी मर्यादा ओलांडली आणि ही माझी चूक होती. मी खजील झालो आहे, अशा प्रकारचा माणूस मला बनायचं नाही. प्रेम आणि सौहार्द्राच्या या सुंदर जगात हिंसेला स्थान नाही.
मला ॲकॅडमीची, शोच्या निर्मात्यांची, उपस्थितांची आणि जगभरातून पाहणा-या सर्वांचीच माफी मागायची आहे. मला विल्यमच्या कुटुंबाची आणि किंग रिचर्डच्या फॅमिलीचीही माफी मागायची आहे. आपल्या देदीप्यमान प्रवासाच्या आलेखावर हा कलंक माझ्यामुळे लागला याचा मला पश्चाताप होतोय. माझा माणूस म्हणून घडण्याचा प्रवास सुरुच आहे!
तुमचाच विल स्मिथ”

View this post on Instagram

A post shared by Will Smith (@willsmith)

या जाहिर माफीनाम्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून विल स्मिथच्या या पोस्टचे कौतुक करताना यशाच्या शिखरावर असूनही आपल्या या चुकीबद्दल माफी मागून त्याच्यातील विनम्र विनयशिलतेचे दर्शन घडवली असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

Latest Post