Thursday, August 7, 2025
Home हॉलीवूड काय सांगता! ऑस्करच्या ‘त्या’ प्रकरणामुळे होतोय विल स्मिथ आणि जेडा पिंकेटचा घटस्फोट?

काय सांगता! ऑस्करच्या ‘त्या’ प्रकरणामुळे होतोय विल स्मिथ आणि जेडा पिंकेटचा घटस्फोट?

हॉलिवूडमधून एक चकित करणारी बातमी समोर येत आहे. तुम्हा सर्वांना नुकतेच झालेलं ‘चापट प्रकरण’ आठवतंय का? तेच प्रकरण, ज्यामध्ये विल स्मिथने (Will Smith) ऑस्कर २०२२चा होस्ट ख्रिस रॉकला (Chris Rock) चापट मारली होती. मात्र आता असे वृत्त आहे की, त्या चापट प्रकरणानंतर विल स्मिथ आणि पत्नी जेडा यांच्यात तणावाचे वातावरण आहे.

द न्यूज इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार, विल स्मिथ आणि जेडा पिंकेट स्मिथ (Jada Pinket Smith) यांच्यातील संभाषण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. दोघे क्वचितच बोलतात. हे प्रकरण इतके वाढले आहे की, हे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. (will smith jada pinkett smith heading for divorce after oscar 2022 slap incident)

एका मॅगझिनच्या रिपोर्टनुसार, ऑस्कर २०२२ मध्ये जेव्हापासून हे चापट प्रकरण झाले, तेव्हापासून दोघांमधील तणाव खूप वाढला आहे. रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले जात आहे की, दोघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून समस्या होत्या. परंतु आता परिस्थिती इतकी बिघडली आहे की, दोघे एकमेकांशी फारसे बोलतही नाहीत. विल आणि त्याच्या पत्नीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यास, अभिनेत्याला आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण विल स्मिथ ३५० दशलक्ष किमतीच्या मालमत्तेचा मालक आहे आणि कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार, घटस्फोटानंतर विल स्मिथला त्याची अर्धी संपत्ती त्याच्या पत्नीला द्यावी लागेल.

ख्रिस रॉकला मारली होती कानाखाली
ख्रिस रॉकने विल स्मिथच्या पत्नीच्या केसांवर (अलोपेसिया सॉल्ट रोगाने ग्रस्त) विनोद केला. त्यानंतर तो स्टेजवर पोहोचला आणि त्याने ख्रिसच्या तोंडावर एक जोरदार चापट मारली. या घटनेच्या एका तासापेक्षा कमी कालावधीनंतर, विलला त्याच्या ‘किंग रिचर्ड’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला, ज्यामध्ये त्याने प्रसिद्ध टेनिसपटू सेरेना आणि व्हीनस विल्यम्स यांच्या वडिलांची भूमिका केली होती.

विल स्मिथवर झाली कारवाई
विल स्मिथची कारवाई अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस, हे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करते. त्यांनी काल म्हणजेच शुक्रवारी झालेल्या बैठकीत या घटनेची दखल घेत त्यांनी कडक कारवाई केली. या घटनेनंतर अकादमीने होस्ट ख्रिस रॉकचेही आभार मानले, कारण त्यादरम्यान त्याने त्या चापटला अतिशय शांतपणे उत्तर दिले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा