Tuesday, July 9, 2024

धक्कादायक! सुपरस्टार थाला अजितच्या घरासमोर महिलेने केला स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न, लावले गंभीर आरोपही

दाक्षिणात्या सिनेसृष्टीचे लोकप्रिय अभिनेता थाला अजित आपल्या प्रभावशाली अभिनयासाठी ओळखले जातात. देशभरात त्यांची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. ते अनेकदा त्यांच्या चित्रपटासाठी चर्चेत येत असतात. मात्र यावेळी अभिनेता चर्चेत येण्याचं कारण त्यांचे चित्रपट नाही, तर वेगळंच काहीतरी आहे.

थाला अजित एका स्त्रीमुळे चर्चेत आले आहेत. वास्तविक, एका रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अजित यांच्या घरासमोर स्वतःला आग लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिला रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. इतकेच नव्हे, तर त्या महिलेने अभिनेत्यावर गंभीर आरोपही केले आहेत. (woman tries to set herself on fire in front of thala ajith house and made serious allegations)

माध्यमातील वृत्तानुसार, रुग्णालयातील नोकरी गमावल्याने तिने स्वत: ला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. तिने याचे कारण अभिनेता थाला अजितला सांगितले. फरजाना असे पीडितेचे नाव आहे. असे म्हटले जात आहे की, जेव्हा अजित आणि शालिनी त्या रुग्णालयात गेले होतेस तेव्हा ती त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवत होती. असे केल्यामुळे तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. नोकरी गेल्यानंतर तिने ती नोकरी परत मिळवण्यासाठी अभिनेता आणि त्यांची पत्नी शालिनी यांना भेटण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु त्यांनी तसे करण्यास नकार दिला.

मात्र असे सांगितलं जात आहे की, ही घटना थांबवण्यासाठी पोलीस अजित यांच्या घरी पोहोचले आणि महिलेला अटक केली. यासह ती वाईट घटना घडली नाही. त्या महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. तर, अजित यांचे चाहते ट्विटरवर त्यांच्या चहित्या स्टारला समर्थन देण्यासाठी ट्वीट करत आहेत.

अजित यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ते ‘वलीमई’मध्ये दिसणार आहेत. याचे दिग्दर्शन एच विनोथ करत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री हुमा कुरेशी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर कार्तिकेय गुम्माकोंडा यात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तथापि, निर्मात्यांनी याच्या रिलीझ डेटबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडला ‘राम राम’ ठोकल्यानंतर, ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने प्रथमच शेअर केला तिचा फोटो

-शूटिंगच्या पहिल्याच दिवशी संजय मिश्रा यांनी दिले होते २८ टेक, अखेर कंटाळून दिग्दर्शकाने केलं ‘हे’ काम

-‘कसं काय पावनं बरं हाय का?’ मृण्मयीने शेअर केला आदिनाथसोबतचा दिलखेचक फोटो

हे देखील वाचा