विवेक अग्निहोत्रींच्या (Vivek Agnohotri) ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शन, कलाकारांपासून ते पटकथेपर्यंत कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटात अशी अनेक सीन आहेत, ज्यांना पाहून प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येत आहेत. अनेकांना रडवणाऱ्या आणि ह्रदयाला हादरा देणाऱ्या या चित्रपटाशी संबंधित वादही थांबण्याचे नाव घेत नाहीत. चित्रपटात एक सीन आहे, ज्यामध्ये धान्याने भरलेल्या ड्रममध्ये एका माणसाला गोळ्या घालण्यात आल्या आहेत.
‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) प्रदर्शित झाल्यानंतर ती पीडिताही समोर आली आहे. जी थेट या चित्रपटाच्या कथेशी संबंधित आहे. पीडिता ही त्याच दूरसंचार अधिकारी बाल कृष्ण गंजू यांची भाची आहे. ज्यावर तांदळाच्या ड्रममध्ये गोळी झाडण्यात आली होती. बाळ कृष्ण गंजू यांची भाची सध्या अमेरिकेत राहत आहे. या घटनेबाबत ती उघडपणे बोलली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, तिने या घटनेचा उल्लेख केला आणि म्हटले की, “ज्याला तांदळाच्या ड्रममध्ये गोळी लागली ते माझे काका होते. त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या.” काश्मीर फाइल्समध्ये हे सीन दाखवण्यात आले आहे. अनेक राज्यांमध्ये ते करमुक्त करण्यात आले आहे आणि अनेक ठिकाणी ते वादात सापडले आहे.
चित्रपटाबाबत अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. राजस्थानच्या कोटामध्ये या चित्रपटामुळे २२ मार्च ते २१ एप्रिलपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत. त्याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी हस्तक्षेप करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या चित्रपटात अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), दर्शन कुमार (Darshan Kumar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ९० च्या दशकात काश्मिरी पंडित, हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कथा आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –