Friday, April 19, 2024

The Kashmir Files | चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आलं ‘हे’ ऐतिहासिक मंदिर, जाणून घ्या त्याची कहाणी

सध्या देशभरात सगळीकडे ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे.  १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या भीषण अत्याचाराच्या घटनेवर हा संपुर्ण चित्रपट आधारित आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाने सध्या राजकीय वातावरणही तापले आहे. कारण या चित्रपटाने अनेक  विस्मरणात गेलेल्या घटना आणि प्रसंग यांच्या आठवणी पून्हा एकदा ताज्या केल्या आहेत.

या चित्रपटाने जसा काश्मिरी पंडितांचा मुद्दा पून्हा वर आला आहे, त्याचप्रमाणे आता मार्तंड सूर्य मंदिरही प्रचंड चर्चेत आले आहे. द काश्मिर फाइल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनीही या मंदिराचा उल्लेख केला होता. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या प्रमाणे नालंदा विद्यापिठात लोक फक्त शिक्षण घ्यायला येत नाहीत त्याचप्रमाणे या मंदिरालाही लोक फक्त प्रार्थना करण्यासाठी नव्हे, तर या मंदिराची रचना पाहण्यासाठी येत होते. आज याच मंदिराचा ऐतिहासिक इतिहास पाहूया.

मार्तंड सुर्यमंदिराची स्थापना काश्मीरचा महान राजा ललितादित्य मुक्तिपिड याने केली होती. हे मंदिर अनंतनागपासून ९ किलोमीटर अंतरावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मंदिराची रचना ८व्या शतकातील असल्याचे सांगितले जात आहे. परंतु दावा केला जातो की, हे मंदिर याआधी अनेक वर्षांपूर्वीपासून होते. मार्तंड महात्म्य या मराठी साहित्यातही या मंदिराचे संदर्भ आढळतात. मुस्लिम सुलतान सिकंदर शाह मिरी याने सैफुद्दीनसह ते पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पूर्णपणे यश आले नाही. हे मंदिर पाडायला बरीच वर्षे लागली. काही इतिहासकारांनी लिहिले आहे की, हिंदू सम्राटांनी बांधलेली अनेक मंदिरे काश्मीरमध्ये होती. सिकंदर शाह मिरीनेही काश्मीरमधून हिंदू आणि त्यांची सांस्कृतिक परंपरा नष्ट करण्याच्या उद्देशाने मंदिरे पाडण्यास सुरुवात केली. सिकंदर शाह मौरीने त्यांपैकी अनेक मंदिरे पाडून त्याच वीट दगडांचा वापर करून मशिदी बांधल्या. ज्यात या सुर्य मंदिराचाही समावेश होता.

कारकेट घराण्यानंतर उत्पल राजवटीच्या काळातही मार्तंड मंदिराचे वैभव जपले गेले. तथापि, १४व्या शतकापर्यंत, मुस्लिम धर्मोपदेशकांच्या विश्वासामुळे हिंदू राजांचा ऱ्हास सुरू झाला. १४व्या शतकाच्या सुरूवातीस, काश्मीरचा शासक राजा सहदेव होता, ज्याचे दोन विश्वासू साथिदार म्हणून लडाखमधील बौद्ध राजपुत्र रिंचेन शाह आणि स्वात खोऱ्यातील दुसरे मुस्लिम धर्मोपदेशक सिकंदर शाहमीर होते. याच काळात ७० हजार सैनिकांसह मंगोल आक्रमक दुल्चूने काश्मीरवर हल्ला केला आणि आपला जीव वाचवण्यासाठी राजा सहदेवला जम्मूच्या किश्तवाडला जावे लागले. दुलचूने काश्मीरमध्ये हिंदूंना आपले गुलाम बनवायला सुरुवात केली. मात्र, त्यावेळी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत त्यांच्या अनेक सैनिकांसह ते शहीद झाल्याचे सांगण्यात येते.

येथे मुस्लिम आक्रमकांना काश्मीर काबीज करण्यासाठी अनुकूल काळ होता आणि त्यांनी तसे केले. सिकंदर शाहमीरने लडाखच्या राजपुत्रालाही काश्मीरच्या गादीवरून काढून टाकले आणि स्वतः शासक बनला. १४१७ मध्ये या सिंहासनावर बसून, सिकंदर जैनुल अबीदिनने हिंदूंना एक तर इस्लाम स्वीकारू नका किंवा काश्मीर सोडू नका असे सांगून नरसंहार सुरू केला. मार्तंड मंदिरावर अनेकवेळा हल्ले झाले आणि १५व्या शतकात हे मंदिर पाडण्यात आले आणि आग लावण्यात आली होती.

या मंदिराबद्दल असे सांगण्यात येते की, या मंदिराला उध्वस्त करण्यासाठी तब्बल एक वर्ष  प्रयत्न सुरू होते. मात्र तरीही त्यांना यामध्ये यश आले नाही. यानंतर या मंदिराचे अवशेष उध्वस्त करुन त्याची पाळे मुळे नष्ट करुन त्याची लाकडे जाळण्यात आली. अशा प्रकारे या ऐतिहासिक मंदिराचा नाश करण्यात आला. त्यानंतर या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा