Thursday, April 25, 2024

असं कुणासोबतही होऊ नये! ‘एड्स’मुळे जीव गमावणारे प्रसिद्ध कलाकार, एका भारतीय अभिनेत्रीचाही समावेश

जगभरात शुक्रवारी (1 डिसेंबर) एड्स दिन साजरा केला जात आहे. जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर, 1988 रोजी प्रथमच साजरा करण्यात आला. एचआयव्ही किंवा एड्स ग्रस्त लोकांना मदत करणे आणि एड्सशी संबंधित अफवा दूर करून लोकांना शिक्षित करणे हा उत्सव साजरा करण्याचा उद्देश आहे. एड्सचे पूर्ण नाव एक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम असे आहे. ज्या विषाणूपासून ते उद्भवते त्याला ह्युमन इम्यून डेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) असे म्हटले जाते. हा एक संसर्गजन्य लैंगिक रोग आहे. अनेक कलाकार देखील या आजाराचे बळी ठरले आहेत. चला जाणून घेऊया कोण होते ते कलाकार…

पेड्रो जमोरा
पेड्रो जमोरा हे अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही कलाकार होते. पेड्रोने उघडपणे आपण समलिंगी असल्याचे कबूल केले. पेड्रो एड्सने ग्रस्त होते आणि 11नोव्हेंबर, 1994 रोजी त्यांचे निधन झाले.

जिया सारंगी
प्रसिद्ध अमेरिकन मॉडेल जिया सारंगी यांचा एड्समुळे मृत्यू झाला. 1985मध्ये न्यूमोनियामुळे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांना त्यांच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू आढळले. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच १८ नोव्हेंबर, 1986रोजी त्यांचे निधन झाले.

निशा नूर
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री निशा नूर हिचा एकेकाळी हिट अभिनेत्रींच्या यादीत समावेश होता. निशा नूरचाही एड्सने मृत्यू झाला होता. 2007 मध्ये निशा एका दरगाहच्या बाहेर आढळून आली होती. रुग्णालयात आणले असता निशाला एड्स झाल्याचे निष्पन्न झाले आणि त्यामुळे तिची प्रकृती अधिकच बिघडत गेली. त्यानंतर २००७ मध्ये निशाने हे जग सोडले. एका निर्मात्याने तिला वेश्याव्यवसायात ढकलले आणि येथूनच तिला एड्स झाला, असे म्हटले जाते.

आर्थर रॉबर्ट ॲशे
आर्थर रॉबर्ट ॲशे हा टेनिसमधील सर्वोच्च स्तरावर खेळणारा पहिला आफ्रिकन-अमेरिकन खेळाडू होता. 1988 मध्ये त्याला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. हृदय शस्त्रक्रियेदरम्यान एचआयव्ही बाधित रक्त संक्रमणामुळे पाच वर्षांपूर्वी त्याला हा आजार झाल्याचे समजले. 1993 मध्ये त्याला एड्समुळे न्यूमोनिया झाला आणि 6 फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्कच्या रुग्णालयात त्याचे निधन झाले.

रॉक हडसन
रॉक हडसन 1950आणि 60च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता होता. डॉरिस डे, ज्युली अँड्र्यूज, एलिझाबेथ टेलर यांसारख्या पडद्यावरच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींशी त्याने रोमान्स केला होता.

सन 1985 मध्ये एड्स संबंधित गुंतागुंतीमुळे हडसनचा मृत्यू झाला होता.

हेही नक्की वाचा-
‘या सगळ्यांसमोर मी आपली इवलुशी, पण…’, ‘झिम्मा 2’फेम अभिनेत्रीच्या पोस्टने वेधल लक्ष
‘इरफानला 5 वर्षां केले डेट, गंभीर करायचा मिस कॉल …’, शमीला प्रपोज करणाऱ्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

हे देखील वाचा