Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

आयुषमान खुरानाच्या पत्नीने केली अमेरिकन मॉडेल केंडल जेनरशी स्वत:ची तुलना, सांगितले वजनदार शरीराचे फायदे

अनेकजण आपली तुलना इतरांशी करत असतात. याला कलाकारही अपवाद नाहीत. आता अशाच प्रकारे एक तुलना आपल्याला पाहायला मिळाली आहे. नुकतेच अमेरिकन मॉडेल केंडल जेनरने आपले फोटोशूट केले. हे फोटोशूट जबरदस्त व्हायरल होत आहे. अशातच लेखिका- चित्रपट निर्माती आणि अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिने आपली तुलना केंडल जेनरशी केली आहे. यासोबतच तिने स्वत:वर प्रेम करणारी पोस्टही लिहिली आहे.

ताहिराने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत, केंडलच्या तुलनेत तिच्या वजनदार शरीराचे अनेक फायदे असल्याचे लिहिले आहे. ती आपल्या या पोस्टमध्ये आपल्या शरीराचे महत्त्व सांगत आहे.

ताहिराने केली जेनरशी तुलना
ताहिरा कश्यप सोशल मीडियावर कधीतरी सक्रिय असते. ताहिराने सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर करत लिहिले की, “केंडल आणि माझे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. तसेच अनेक महिलांप्रमाणे मी देखील विचार करत होते की, असे दिसणे शक्य आहे? तिचे बेली बटण मोहक आहे आणि मुलांना काळा टिक्का लावल्यासारखे आहे. कपड्याचा हा छोटा तुकडा कोणाचीही गोपनीयता कशी लपवू शकतो, हे मला माहित नाही.”

या शरीरामुळे मला हीरोप्रमाणे वाटले
केंडलसोबत आपली तुलना करताना ती पुढे लिहिते की, “ती वेळ माझे वास्तव समजून घेण्याची होती. मी जे पाहिले त्याबद्दल मी काय विचार करते? ६९ किलो वजनाच्या महिलेने तिच्या मजबूत अंग व जखमांसह तिच्या कुत्र्याला, मुलीला आणि बहिणीला खराब लिफ्टमध्ये अडकण्यापासून वाचवले होते. मी जिब्राल्टरच्या एका खडकाप्रमाणे उभी राहिले, पूर्ण ताकदीने दार उघडले आणि तिघांनाही बाहेर काढले. या वजनामुळे मला स्वत: ला एका हीरोप्रमाणे वाटले आणि त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त केली, जे मी कमी करण्याचा प्रयत्न करत होते…

विशेष म्हणजे सध्या अमेरिकन मॉडेल केंडल जेनरच्या हॉट फोटोंनी इंटरनेटवर धुमाकून घातला आहे. ती या फोटोमध्ये बिकिनी घातली आहे. हे फोटो व्हायरल होत आहेत. तिचे शरीर पाहून प्रेक्षक दंग झाले आहेत आणि स्वत:लाच प्रश्न करत आहेत की, कोणाचे शरीर असेही असू शकते का?

हे देखील वाचा