Tuesday, June 24, 2025
Home मराठी पंतप्रधानांबद्दलचे ते अपशब्द भोवणार, अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पंतप्रधानांबद्दलचे ते अपशब्द भोवणार, अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सध्या अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali sayed) राज्याच्या राजकारणात चांगल्याच चर्चेत असलेल्या पाहायला मिळत आहेत. दिपाली सय्यद यांनी मराठी सिने जगतात अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले होते. ज्यामधील त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. मात्र अलिकडच्या काळात त्या राजकारणात सक्रिय झालेल्या दिसत असून नुकतेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्दात टिका केली होती. आता हे प्रकरण दिपाली सय्यद यांना महागात पडले असून त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. यामध्ये दिपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली होती. त्याचप्रमाणे  नुकतेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्या ट्विटरवरुन जोरदार टिका केली होती. त्यांच हे ट्विट सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले होते. त्यांच्या या ट्विटमुळे अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली होती. त्याचबरोबर आता त्यांच्याविरोधात गुन्हा ही नोंद करण्यात आला आहे.

दिपाली सय्यद यांनी भाजपा नेत्यांवर टिका करताना “किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर नेते भाजपामध्ये जावून पवित्र होतात. त्यानंतर त्यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही. अशा नेत्यांना पाठीशी घालणारा….पंतप्रधान देशाने कधीही पाहिला नसेल,” अशी टिका त्यांनी आपल्या ट्विटमधून केली होती. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी टिकाही केली होती. आता त्यांच्या या ट्विटवर ओशिवारा पोलिस ठाण्यात लेखी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आता दिपाली सय्यद यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान दिपाली सय्यद यांनी याआधीही राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा