‘साडीपण तुझ्यासारखीच सुंदर हाय’, सौंदर्याची खाण मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यदचे फोटो पाहून चाहत्याची लक्षवेधी कमेंट

Actress Deepali Sayed share her saree photo on social media


सौंदर्याची खाण आणि मोहक अदांनी आपल्या प्रेमात पाडणारी मराठी अभिनेत्री म्हणजेच दिपाली सय्यद. दिपाली सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणेच मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करण्याची एकही संधी ती सोडत नाही. दिपालीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पैठणी साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांनी हा फोटो बघता क्षणीच कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. यावेळी एका चाहत्याने केलेली कमेंट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

दिपाली सय्यदने तिच्या फेसबुक पेजवर पैठणी साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पोपटी रंगाची पैठणी आणि काळ्या रंगाचा पूर्ण बाहीचा ब्लाऊज परिधान केला आहे. तसेच तिने कपाळावर चंद्रकोर लावली आहे आणि नाकात नथ घातली आहे. गळ्यात काळया रंगाची ज्वेलरी घातली आहे. मोकळ्या सोडलेल्या केसांमुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. तिचा हा मराठमोळा लूक बघून तिचे चाहते खूप खुश झाले आहेत.

फेसबुक पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दिपालीच्या फोटोवर कमेंट करून तिचे चाहते तिचे कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “साडीपण तुझ्यासारखीच सुंदर हाय.” दुसऱ्या एका युजरने कमेंट केली आहे की, “तू खूप सुंदर दिसत आहे.” नुकतेच दिपालीचा वाढदिवस झाला आहे. त्यामुळे सगळेजण तिला शुभेच्छा देत आहेत.

दिपाली ही एका उत्तम अभिनेत्री सोबत एक डान्सर देखील आहे. तिने मराठीमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. यात ‘होऊन जाऊ दे’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘करायला गेलो एक’, ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘दुर्गा म्हणतात मला’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…


Leave A Reply

Your email address will not be published.