असं म्हणतात की या जगात एकाच चेहऱ्याचे सात व्यक्ती असतात. हे विधान कितपत खरे आहे हे माहित नाही, मात्र एक सारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्ती आपल्याला कधीकधी अगदी सहजच सापडतात. आता मनोरंजन क्षेत्रातच जर आपण पाहिले, तर काही कलाकारांच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेले काही चेहरे दिसतातच. सोशल मीडियावरही कधीकधी आपण सारखे दिसणारे कलाकार बघतो.
आता हिंदी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या यामी गौतमच्या चेहऱ्याशी साम्य असलेला एक चेहरा टेलिव्हिजन विश्वात आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे, विदिशा श्रीवास्तव . विदिशा ही उत्तर प्रदेशची रहिवासी असून बिजनस मॅनेजमेन्टसोबतच तिने बायोटेक्नॉलॉजीचाही कोर्स केला आहे.
पण विदिशाला अभिनेत्री व्हायचे होते. म्हणून तिने अभ्यास पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले. ती फक्त हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतच नाही, तर दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम करते. विदिशाला आता ‘टीव्हीची यामी गौतम’ म्हणूनही ओळखले जात आहे. विदिशा आणि यामी यांचे हास्य आणि सामान्यतः त्या दोघींची हेयरस्टाइलही सारखी असते.
साल २०१७ मध्ये विदिशाने टीव्हीच्या जगात प्रवेश केला. पहिला टीव्ही शो ‘ये है मोहब्बतें’मध्ये तिने काम केलं. यात तिने इशिताच्या सूनेची भूमिका साकारली होती. विदिशाने ‘ये जादू है जीन का’, ‘तुझसे है राब्ता’, ‘मेरी गुडिया’ आणि ‘श्रीमद् भागवत महापुराण’, ‘कहत हनुमान जय श्री राम’ अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
विदिशा केवळ एक अभिनेत्री नसून एक ट्रॅव्हल ब्लॉगरही आहे. याचा उल्लेख तिने आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरही केला आहे. इतर सेलिब्रिटींप्रमाणे विदिशाही सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. विदिशा तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. ती आपले स्टायलिश आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-