Thursday, April 25, 2024

लय भारी! डिझायनर लेहंगा सोडून यामीनं लग्नात नेसली होती आपल्या आईची ३३ वर्षे जुनी साडी

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम ही सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध झाली आहे. यामीने अचानक तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना हैराण केले होते. तिने खूपच साध्या पद्धतीने लग्न केले आहे. तिने आपल्या घरीच दिग्दर्शक आदित्य धर सोबत विवाह सोहळा उरकला आहे.

तिच्या लग्नातील तिचा लूक खूप चर्चेत आहे. तिचा साधेपणा तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिने डिझायनर लेहंगा सोडून लग्नात लाल रंगाची सिल्क साडी तसेच त्याच्यावर सोन्याची ज्वेलरी परिधान केली होती. यात ती पारंपरिक लूकमध्ये दिसत होती. तिचा हा लूक सगळ्यांना खूपच आवडला आहे. सगळेजण तिचे खूपच कौतुक करत आहेत.

यामीला या पारंपरिक पोशाख पाहून तिचे चाहते खूपच खुश झाले आहेत. ती नवरीच्या वेशात खूपच सुंदर दिसत होती. तिच्या लूकची चर्चा लग्नाच्या आठवड्या‌भरानंतरही चालू आहे. तिने लग्नानंतर तिची हळद, मेहंदी, लग्न यातील सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबत तिने हिरव्या रंगाची साडी घालून भांगात कुंकू भरलेला फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता.

यामीच्या लग्नातील लूक खूप चर्चेत होता. माध्यमातील वृत्तानुसार, यामीने लग्नात तिच्या आईची 33 वर्ष जुनी सिल्कची साडी घातली होती. यासोबत तिने तिच्या आजीने दिलेला लाल ओढणी घेतली होती. तिच्या लग्नात तिने स्वतःच तिचा मेकअप केला होता, तर तिच्या बहिणीने तिची हेअर स्टाईल केली होती.

यामीने विकी कौशल सोबत ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’मध्ये काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर हे होते.

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘दसवी’ आणि ‘भूत पुलिस’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. याआधी तिने ‘काबील’ आणि ‘विक्की डोनर’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेग्नंसीच्या वृत्तांमध्ये समोर आला अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा पहिला फोटो; ६ महिने गरोदर असल्याचा दावा

-‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; नेहमीप्रमाणेच सायरा बानो यांची होती त्यांना साथ

-‘मीच माझ्या स्वप्नातली स्त्री!’, भाग्यश्री मोटेच्या हॉट ऍंड ब्यूटीफुल फोटोसोबतच लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत

हे देखील वाचा