सध्या छोट्या पडद्यावर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgath )ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच लोकांची मने जिंकली आहेत. मालिकेची कथा आणि अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला असून कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सध्या मालिका एका रंजक वळणावर आली असून यामध्ये आता लवकरच आता लवकरच मालिकेत नेहा आणि यशच्या लग्नाचा बार उडालेला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या विवाह सोहळ्याची मालिकेच्या प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत सध्या नेहा आणि यशच्या लग्नाची गडबड सुरू झाली आहे. नेहाचे हे सत्य तिच्या घरी समजल्यानंतर पहिल्यांदा तिच्यावर घरची मंडळी नाराज झाली होती. पण हा राग निवळून आता दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झालेली पाहायला मिळत आहे. चौधरी परिवारातील लग्न म्हणजे मोठा थाटमाट पाहायला मिळणार आहे. लग्नामध्ये चांगलाच शाही थाट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. इतकेच नव्हेतर हा लग्न सोहळा तब्बल आठवडाभर चालणार आहे. ज्यामध्ये हळदीचे, मेहंदीचे सगळेच विधी मोठ्या थाटात पार पडणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना हा विवाह सोहळा पाहण्याची चांगलीच उत्सुकता लागली आहे.
सध्या या विवाह सोहळ्याच शुटिंग पार पडत आहे. पण प्रेक्षकांना या विवाह सोहळ्याच्या आनंदासोबतच एक महत्वाचा ट्विस्टही लग्न समारंभात पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे यशच्या हातात एक नव्हेतर दोन दोन अंगठ्या पाहायला मिळत आहेत. आता ही दुसरी अंगठी कोणासाठी असेल, कोणता नवीन थरार मालिकेत पाहायला मिळेल. याचीच मालिकेच्या प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.दरम्यान या मालिकेत प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे असे आघाडीच्या कलाकारांचा अभिनय पाहायला मिळत आहे.
- हेही वाचा-
- ‘मी शांत आहे मात्र आजारी नाही’, म्हणत धर्मेंद्र यांनी स्वतःच केला त्यांच्या तब्येतीबद्दल खुलासा
- बॉलिवूडमधील लोकप्रिय असणाऱ्या ‘या’ कलाकारांना डेलीसोप क्वीन एकता कपूरने केले आहे या क्षेत्रात लाँच
- अमृता रावने सहन केलंय मूल गमावल्याचं दुःख, तब्बल चार वर्षे डॉक्टरांकडे फेऱ्या मारत होती अभिनेत्री