सन २०१८ साली टॉलिवूडमध्ये एक जबरदस्त चित्रपटाचे आगमन झाले होते, ज्याने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. त्या चित्रपटाचे नाव आहे ‘केजीएफ: चाप्टर १’. हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला. ज्यामुळे याच्या निर्मात्यांनी याचा दुसरा भाग म्हणजेच, ‘केजीएफ: चाप्टर २’ निर्माण करण्याचे ठरवले. हा बहुप्रतिक्षित चित्रपट आता १६ जुलै २०२१ ला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रदर्शित होण्यापूर्वी चाहत्याकडून एक मजेशीर घटना घडली आहे.
चाहत्यांसाठी ‘केजीएफ: चाप्टर २’ हा सिनेमा नसून एक भावना आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटातील अभिनेता यशचा चाहतावर्ग खूप जास्त आहे. त्यामुळे आता त्याच्या चाहत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चित्रपट प्रदर्शित होणारा दिवस ‘राष्ट्रीय सुटीचा दिवस’ घोषित केला जावा असे, आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले असेच एक पत्र आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये मोदींना म्हटले आहे की, त्यांनी चाहत्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.
‘आमच्या भावना समजून घ्या’- चाहत्यांचे मोदींना आवाहन
मोदींना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, “सर, जसे की आपणा सर्वांना माहिती आहे की ‘केजीएफ: चाप्टर २’ शुक्रवारी म्हणजेच १६ जुलै २०२१ रोजी प्रदर्शित होत आहे. चाहत्यांना या सिनेमाची खूपच उत्सुकता लागली आहे. अशामध्ये आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की, हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस (National Holiday) घोषित करा. आमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा केवळ एक चित्रपट नाही, तर आमची भावना आहे.” यशच्या एका चाहत्याने हे पत्र ट्विटरवर शेअर केले आहे.
Dear @PMOIndia @narendramodi sir Consider Fans Emotion???????? And Declare National Holiday On 16/7/2021????#KGFChapter2 #YashBOSS #KGFChapter2onJuly16 pic.twitter.com/1Idm64pgwV
— Rocky Vaiii (Brand ????) (@styles_rocking) January 30, 2021
चित्रपटाच्या टिझरने स्थापित केले नवे विक्रम
‘केजीएफ: चाप्टर २’ चित्रपट संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात यशने रॉकीची भूमिका साकारली आहे, जो गरीब कुटुंबात जन्मतो आणि त्यानंतर सोन्याच्या खाणीचा राजा बनतो. चित्रपटाच्या टिझरने आधीच सोशल मीडियावर नवे विक्रम स्थापित केले आहेत.
या कलाकारांचा असणार समावेश
या चित्रपटात यशव्यतिरिक्त श्रीनिधी शेट्टी, बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त, रवीना टंडन यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा करत याचा नवीन पोस्टरही जारी केला होता.
हेही वाचा-
केजीएफ सिनेमाच्या सुपरस्टार हिरोचे वडील आजही चालवतात बस, जाणून घ्या काय आहे कारण
बहुप्रतिक्षित चित्रपट केजीएफ२ चा टिझर झाला लीक, ठरलेल्या वेळेआधीच झाला प्रदर्शित!