Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड अभिषेकपासून कंगनापर्यंत, ‘या’ कलाकारांनी यावर्षी केलंय जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

अभिषेकपासून कंगनापर्यंत, ‘या’ कलाकारांनी यावर्षी केलंय जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

बॉलिवूड कलाकार पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारतात. प्रत्येक पात्राचे वेगळे रूप आणि व्यक्तिमत्त्व असते, त्यानुसार कलाकाराला जुळवून घ्यावे लागते. हे सगळे करताना काहीवेळा अगदी सोप वाटते. हे सगळे अप्रतिम मेकअप किंवा प्रोस्थेटिक वापरले आहे. होय हे खरे आहे की, कधी कधी डबल बॉडी, मेकअप किंवा प्रोस्थेटिक वापरले जाते, पण प्रत्येक वेळी असे होत नाही. वजन कमी करायचे असेल किंवा वजन वाढवायचे असेल, त्या पात्राशी जुळवून घेण्यासाठी कलाकार खूप मेहनत घेतात.

जेव्हा अभिनयाचा विचार केला जातो, तर कलाकार पात्र साकारण्यासाठी तासनतास घाम गाळतात. ते त्यांच्या आहाराशीही तडजोड करतात. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या व्यक्तिरेखेच्या चौकटीत इतके जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे की, त्यांना ओळखणेही कठीण झाले होते. मग ती कंगना रणौत असो वा अभिषेक बच्चन. चला तर मग जाणून घेऊया, २०२१ मध्ये कोणते स्टार्स होते, ज्यांनी आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना आश्चर्यचकित केले.

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)
बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिषेकने अप्रतिम बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले, जे पाहून सगळेच थक्क झाले. या चित्रपटात अभिषेकने बॉब नावाच्या गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. जो मध्यम वयाचा आहे आणि त्याचे वजनही खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत अभिषेकने या चित्रपटात अस्सल दिसण्यासाठी प्रोस्थेटिक पोट लावण्यास नकार दिला आणि या भूमिकेसाठी त्याने आपले वजन वाढवले. या भूमिकेसाठी कधीकाळी अभिषेकने १०५ किलोपर्यंत वजन वाढवले होते. अभिषेक बच्चनने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, त्याच्यासाठी हे खूप कठीण होते.

कंगना रणौत (Kangana Ranaut)
कंगनाने चित्रपटसृष्टीत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मग ते ‘मणिकर्णिका’मधील राणी लक्ष्मीबाईचे पात्र असो किंवा ‘थलायवी’मधील जयललिता. कंगना प्रत्येक पात्रासाठी खूप मेहनत घेते. ‘थलायवी’ या चित्रपटात कंगनाने असे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे की, तिचा लूक पाहून तिला ओळखणे कठीण आहे.

क्रिती सेनन (Kriti Sanon)
क्रिती सेनन ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी स्वत:ला नेहमी स्लिम आणि फिट ठेवते. पण ही अभिनेत्री देखील तिच्या व्यक्तिरेखेमध्ये उतरण्यात मागे नाही. यावर्षी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिमी’ या चित्रपटात क्रिती सेननने गर्भवती महिलेची भूमिका साकारली होती. चित्रपटात प्रेग्नंट दिसण्यासाठी क्रितीने १५ किलो वजन वाढवले ​​होते.

फरहान अख्तर (Farhan Akhtar)
फरहान अख्तर बॉलिवूडमध्ये दमदार भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. मिल्खा सिंगच्या भूमिकेत बसण्यासाठी त्याने स्ट्रिक्ट डाएट केले असताना, २०२१ मध्ये त्याने ‘तुफान’ चित्रपटासाठी दोन ते तीनवेळा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले. सर्वप्रथम, फरहानने आपले वजन ६९ वरून ८५ किलोपर्यंत वाढवले. त्यानंतर पात्राच्या मागणीनुसार त्याने पुन्हा वजन कमी केले. यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. फरहानने सोशल मीडियावर तीन वेगवेगळ्या बॉडी शेपमध्ये त्याचा फोटो देखील पोस्ट केला आहे आणि या पोस्टमध्ये फरहानने सांगितले की, यासाठी त्याने १८ महिने खूप मेहनत घेतली आहे.

आयुष्मान खुराना (Ayushman Khurana)
आयुष्मान खुराना बॉलिवूडमध्ये त्याच्या अभिनयासोबतच गायनासाठी ओळखला जातो. आयुष्मानने नेहमीच आउट ऑफ द बॉक्स पात्रे साकारली आहेत.

त्याच्या अलिकडच्या ‘चंदीगड करे आशिकी’ या चित्रपटात आयुष्मान एका बॉडीबिल्डरच्या भूमिकेत आहे. जो स्पर्धेसाठी तयारी करत आहे. या चित्रपटात आयुष्मानने त्याच्या फिट बॉडी आणि हेवी लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. या व्यक्तिरेखेमध्ये बसण्यासाठी त्याने केवळ वजनच वाढवले ​​नाही, तर त्याचे मसल्स आणि ॲब्सही बनवले आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा