Saturday, November 23, 2024
Home नक्की वाचा Memories 2021: ‘मिमी’ ते ‘छोरी’, बॉलिवूडच्या ‘या’ महिलाप्रधान चित्रपटांनी गाजवले २०२१

Memories 2021: ‘मिमी’ ते ‘छोरी’, बॉलिवूडच्या ‘या’ महिलाप्रधान चित्रपटांनी गाजवले २०२१

नव्वदच्या शतकातील चित्रपटात स्त्रियांना आई, निरागस पत्नी, प्रेमात वेडी प्रेयसी, प्रेमळ बहीण, त्यांच्या हद्दीत राहणारी मुलगी अशा भूमिकेत दाखवण्यात यायचे. परंतु आता काळ बदलला आहे. एकविसाव्या शतकातील चित्रपटांमध्ये स्त्रिया मजबूत, निर्भय, निडर, स्वतःच्या हक्कासाठी लढताना दिसत आहेत. गेल्या काही काळापासून महिलांवर अनेक महिलाप्रधान चित्रपटही प्रदर्शित होत आहे. असेच काही चित्रपट यावर्षी देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले. तर पाहूया कोणकोणते चित्रपट होते.

शेरनी
‘शेरनी’ या चित्रपटात विद्या बालन (Vidya Balan) एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत साकारली होती. जे मानव-प्राणाचा संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. अमित मसुरकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात स्त्री पुरुष प्रधान जगात प्रवेश करण्यासाठी कशी धडपड करते हे दाखवले आहे. (these films led by strong women in 2021)

मिमी
या चित्रपटात सरोगेसीविषयी कथा सांगण्यात आला आहे. यात क्रिती सेनन (Kriti Sanon) हिने सरोगेट महिलेची भूमिका साकारली आहे. अभिनेत्रीने एका छोट्या शहरातल्या मुलीची भूमिका साकारली, जिला बॉलिवूडमध्ये काम करायचे असते. तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला पैशांची गरज असते. म्हणून ती एका विदेशी जोडप्यासाठी सरोगेट बनते. काही कारणामुळे त्या मुलाचे संगोपन तिलाच करावे लागते. या चित्रपटात असे दाखवले आहे की. अविवाहीत मुलगी देखील एका मुलाचे संगोपन करू शकते.

रश्मी रॉकेट
या चित्रपटामध्ये तापसी पन्नू (Taapsee Pannu) एका छोट्या शहरातील मुलीची भूमिका साकारली होती. जिला एथलिट बनायचे असते. ती राष्ट्रीय स्तरावर सर्वात वेगवान रनर बनण्याचे स्वप्न पूर्ण करते. परंतु तिच्या आनंदात अडथळा येतो कारण तिला लिंग चाचणी करण्यास सांगितले जाते.

त्रिभंगा
‘त्रिभंगा’ हा चित्रपट तीन पिढ्यांवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये काजोल (Kajol), तन्वी आझमी, मिथिला पालकर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे जगायचं असतं, मग त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अपेक्षा आणि निर्भय लादले गेले तरी मंजूर!

छोरी
नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) अभिनित ‘छोरी’ हा चित्रपट ‘लपाछपी’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. हा चित्रपट एका गर्भवती स्त्रीबद्दल आहे, जी आपल्या मुलाला अलौकिक आणि सामाजिक वाईट गोष्टी पासून वाचविण्याचा प्रयत्न करीत असते.

पग्लैट
सान्या मल्होत्राने (Sanya Malhotra) ‘पग्लैट’ या चित्रपटात पतीच्या निधनानंतर संघर्ष करणाऱ्या महिलेची भुमिका साकारली आहे. ती या दुःखामध्ये स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करते. या चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश बिष्ट आहेत. हा चित्रपट सामाजिक घटकांवर आधारित आहे. जे लोक असे मानतात की विधवा स्त्री तिच्या आयुष्यात काहीच करू शकत नाही, त्यांच्यासाठी हा चित्रपट एक उत्तर आहे.

सायना
‘सायना’ चित्रपट सायना नेहवालचा बायोपिक आहे.

सायना एक उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू असते. या चित्रपटात हरियाणा पासून ते रँकिंग नंबर १ पर्यंत तिचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ही मुख्य भूमिकेत दिसली आहे.

हेही वाचा :

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा