कोरोना काळ असूनही मनोरंजन क्षेत्रात कोरोनाचे सर्व नियम पळून सनईचे सूर वाजत आहे. २०२१ सुरु झाल्यापासून अनेक कलाकारांनी लगीन गाठ बांधली आहे. नुकतीच यामी गौतमने तिच्या लग्नाची अचानक माहिती देऊन सर्वानाच सुखद धक्का दिला. यामीच्या पाठोपाठ बॉलिवूडची अजून एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे.
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचा ‘ये जवानी है दिवानी’ हा सिनेमा सर्वानाच आठवत असेल, या सिनेमातील एवलिन शर्मा या अभिनेत्रीने लग्न केले आहे. एवलिनने ऑस्ट्रेलियातील डेंटल सर्जन डॉक्टर तुषान भिंडी याच्यासोबत एवलिनने लग्न केले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्नाची माहिती दिली आहे. सोबतच तिने लग्नाचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत.
ब्रिस्बेनमध्ये १५ मे, २०२१ रोजी तिने लग्न केले असून, या लग्नात कोरोनाची परिस्थिती बघता अगदी मोजक्या आणि जवळच्या लोकांच्या उपस्थिती हे लग्न झाले आहे. लग्नात एवलिनने पांढऱ्या रंगाचा गौण घातला असून, तुषानने ब्लू रंगाचा सूट घातला आहे. एवलिनने ही बातमी देताना हार्ट ईमोजी सोबत ‘कायम,’ असे कॅप्शन दिले आहे.
लवकरच एवलिन आणि तुषान लग्नाचे ग्रँड रिसेप्शन देणार आहेत. एवलिन आणि तुषानने सांगितले की, “आम्हाला आमचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने करायचे होते. आमच्यासाठी हा समारंभ फक्त आमचा ठेवायचा होता, त्यामुळे आम्ही कोणालाच या लग्नाबद्दल कल्पना दिली नव्हती. २०१९ साली जेव्हा आमचा साखरपुडा झाला त्यानंतर लगेचच आम्हाला लग्न करायचे होते. मात्र, कोव्हिडमुळे आमचे संपूर्ण प्लँनिंग फसले. आम्हाला आमचे नाते अधिकृत करायचे होते, यासाठी आम्ही अगदी सध्या पद्धतीने लग्न केले.”
एवलिन ही जर्मनीची असून तिचे वडील भारतीय आणि आई जर्मन आहे. तिने ‘यारियां, ‘मैं तेरा हिरो’, ‘ये जवानी है दीवानी’ आदी अनेक सिनेमात काम केले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…