खानविलकरांची सून होण्यासाठी स्विटू झाली तयार, नववधूच्या वेशातील व्हिडिओ व्हायरल


‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट येत आहेत. मध्यंतरी सगळ्या प्रेक्षकांना निराश करणारी ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात पूर्वीप्रमाणे स्थान बनवू पाहत आहे. प्रेक्षक देखील सध्या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. मालिकेत येणाऱ्या काही एपिसोडमध्ये स्विटू आणि ओमचे लग्न दाखवण्यात येणार असून, याचे काही प्रोमो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या लग्नाचा क्षण कधी येणार आहे याची सगळेजण वाट पाहत आहेत. अशातच स्विटूचा नवरीच्या वेशातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

हा व्हिडिओ झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, स्विटूने लाल रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे. यासोबत तिने ज्वेलरी आणि हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा घातला आहे. यासोबत हातावर आणि पायावर मेहेंदी देखील काढलेली दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘हवा मे उडती जाये’ हे गाणे लागले आहे. या गाण्यावर ती गॉगल घालून डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. (Yeu kashi tshi mi nandayala sweetu’s bride look video viral on social media)

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच त्यांचे सगळे चाहते त्यांचे लग्न बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत हे सांगत आहेत. ओम आणि स्विटूची जोडी सगळ्यांना खूप आवडते. सोशल मीडियावर त्यांचे ‘स्विकार’ नावाने अनेक फॅन पेज चालू केले आहेत.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’, या मालिकेत अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांची जोडी सुरुवातीपासूनच सगळ्यांना खूप आवडते. मालिकेची कहाणी देखील काही वेगळी आहे प्रेक्षकांना भावणारी आहे. त्यामुळे मालिकेला सध्या अमाप प्रेम मिळत आहे. अन्विताने या आधी ‘टाईमपास’ या चित्रपटात काम केले आहे. परंतु तिला खरी ओळख ‘गर्ल्स’ या चित्रपटाने दिली. या चित्रपटातील तिचा अभिनय सगळ्यांना खूप भावला होता.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!