गायक यो यो हनी सिंग यांचे नवीन गाणे ‘सैयां जी’ रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये अभिनेत्री नुसरत भरुचा हनी सिंगसोबत दिसली आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर काही मिनटांतच तीन लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या गाण्यातील नुसरत भरुचा आणि हनी सिंगची जोडी चाहत्यांना खूप आवडली आहे.
टी-सीरिजच्या बॅनरखाली बनविलेले हे गाणे रिलीजपूर्वी चर्चेत आले होते. रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी यूट्यूबवर जात हे गाणे पाहण्यासाठी अजिबात उशीर केला नाही. नुसरत भरुचाची स्टाईल लोकांना खूप आकर्षित करत आहे. यापूर्वी हनी सिंगबरोबर गाणी रेकॉर्ड केलेल्या नेहा कक्कऱने नुसरत भरूचाला आवाज दिला आहे.
हनी सिंगने नुकतेच ‘फर्स्ट किस’ आणि ‘जिंगल बेल’ ही दोन गाणीही रिलीज केले आहे. दुसऱ्या बाजूला नुसरत भरुचाचा अखेरचा रिलीज झालेला चित्रपट ‘छलांग’चे देखील चांगलेच कौतूक होत आहे. या चित्रपटात नुसरतसोबत अभिनेता राजकुमार रावसोबत दिसला होता. चित्रपटातील ‘केअर नि करदा’ या गाण्याने लोकांच्या प्ले लिस्ट मध्येही वरचे स्थान मिळवले होते. नुसरत भरुचा लवकरच ‘छोरी’ चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे शूटिंगही सुरू झाले आहे.