Friday, November 22, 2024
Home अन्य ‘या’ हरियाणवी डान्सरने लावले जोरदार ठुमके; डान्स मूव्हज पाहून तुमचेही थिरकतील पाय

‘या’ हरियाणवी डान्सरने लावले जोरदार ठुमके; डान्स मूव्हज पाहून तुमचेही थिरकतील पाय

हरियाणवीची डान्सर सपना चौधरी देशभरात प्रचंड लोकप्रिय आहे. आता सपना चौधरी प्रमाणे, इतर अनेक हरियाणवी डान्सर धुमाकूळ घालत आहेत. अनेक डान्सर खूप लोकप्रिय झाले आहेत आणि लोक त्यांचा डान्स पाहून स्वतःला थिरकण्यापासून थांबवू शकत नाहीत. आजकाल प्रियंका चौधरी आणि आर.सी. उपाध्याय खूप हिट होत आहेत. लोकांच्या नजरा त्यांच्या डान्स मूव्हजवर असतात. झटपट डान्स मूव्हजसह उपाध्यायचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

उपाध्यायने पुन्हा घातला धुमाकूळ
उपाध्याय तिच्या प्रत्येक व्हिडिओसह धुमाकूळ घालते, परंतु यावेळी तिचा हा व्हिडिओ अनेकांना घायाळ करत आहे. उपाध्यायचा अंदाज लोकांची मने जिंकणारा आहे. तिच्या जबरदस्त डान्सने बर्‍याच लोकांना तिच्याबरोबर उभे राहून डान्स करण्यास प्रवृत्त केले आहे. तिच्या अदाकारीने आणि दमदार डान्स मूव्हजने ती सर्वांचे लक्ष वेधत आहे.

‘गोरा गोरा रूप’ या गाण्यावर केला डान्स
या व्हिडिओमध्ये उपाध्यायने ‘गोरा गोरा रूप’ या गाण्यावर कहर केला आहे. या व्हिडिओमध्ये उपाध्यायची एनर्जी आश्चर्यकारक आहे. तिने प्रत्येक तालावर डान्स केला आहे. डान्स करताना तिच्या एनर्जीने आणि धाडसी चालीने ती प्रेक्षकांना घायाळ करते. या व्हिडिओमध्ये ती प्रत्येक मूव्हजने लोकांच्या मनावर घाव घालत आहे. उपाध्याय तिच्या अप्रतिम डान्समुळे तिच्या आसपासच्या भागात प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचे व्हिडिओ यूट्यूबवरही लोकप्रिय आहेत.

सपना चौधरीलाही दिली टक्कर
उपाध्याय या व्हिडिओमध्ये एकामागून एक आश्चर्यकारक डान्स मूव्हज दाखवत आहेत. ती डान्स मुव्हजबरोबर आश्चर्यकारक एक्स्प्रेशन देखील देत आहे. तुम्ही सुद्धा उपाध्यायचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिचे चाहते व्हाल. कदाचित तुम्हाला असेही वाटेल की, उपाध्याय खरोखरच सपना चौधरीला टक्कर देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूरने धोती आणि कुर्ता अशी केली पुरुषी वेशभूषा, वडील अनिल कपूर यांनी दिली प्रतिक्रिया

-‘बिग बॉस ओटीटी’वर निया शर्माचा जलवा; ‘वाईल्ड कार्ड’ म्हणून करणार एन्ट्री

-सलमानला पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन; आज एवढ्या पैशांमध्ये साधा स्मार्टफोनही नाही येत

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा