बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थातच सलमान खानचा जवळचा, अत्यंत विश्वासू तसेच त्याची सावली म्हणून गुरमित सिंग उर्फ शेरा हा संपूर्ण देशात ओळखला जातो. मागील काही वर्षांपासून तो सलमान खानचा ‘बॉडीगार्ड’ म्हणून काम करत आहे. ज्या ठिकाणी सलमानला जायचं झालं तिकडे तो एका दिवसाअगोदर पोहोचतो. शेरा हा सलमानसाठी एक कर्मचारी नाही, तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांपैकी एक आहे.
सलमान खान आणि शेरा हे अनेकदा एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो शेयर करताना दिसत असतात. इतकेच नव्हे तर आपल्या जवळच्या मित्रांप्रमाणे ते एकमेकांना सांभाळून घेत असतात. एका प्रसिद्ध वेबसाईटच्या वृत्तानुसार, सलमानला सुरक्षा देण्याच्या बदल्यात शेराला जवळपास महिन्याला १५ लाख रुपये मिळतात, म्हणजेच त्याची वार्षिक कमाई ही २ कोटी इतकी आहे.
शीख सामुदायातील शेरा याला लहानपणापासून बॉडी बिल्डिंगची आवड होती. विशेष म्हणजे सन १९८७ मध्ये शेराने ‘ज्युनियर मिस्टर मुंबई’ आणि त्यानंतर ‘मिस्टर महाराष्ट्र’ हा किताब आपल्या नावावर केला होता. त्याच्या वडिलांचे मुंबईत गाडी रिपेयर करण्याचे वर्कशॉप होते. परंतु घरात एकुलता एक असल्याने त्याने वेगळे क्षेत्र निवडले, आणि आपल्या मित्राच्या सांगण्यावरून सिनेसृष्टीतील कलाकार आणि व्यावसायिक यांना सुरक्षा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले.
शेराने सन १९९३ साली बॉडीगार्डच्या रुपात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला तो काही बॉलिवूड कलाकारांसोबतच हॉलिवूडमधील कलाकारांना सुद्धा भारतात शुटिंगसाठी आल्यावर सुरक्षा देऊ लागला. त्यानंतर सन १९९५ मध्ये त्याचे नशीबच उजळले, जेव्हा सोहेल खानने सलमान खानच्या परदेश दौऱ्यासाठी शेराच्या कंपनीकडून सेवेची मागणी केली होती. त्याने सलमान खानसोबत काम करणार का असे विचारले होते?, त्यावेळी त्याच्या कामाने प्रभावित झालेल्या सलमानने त्याला नेहमीसाठी आपला बॉडीगार्ड म्हणून ठेवले.
सलमानच्या सांगण्यावरून शेराने विजक्रॉफ्ट म्हणून इव्हेंट कंपनी उघडली होती. इतकेच नव्हे तर ‘टायगर सेक्युरिटी’ म्हणून सुद्धा त्याची एक कंपनी आहे, जी अनेक स्टार्सना सुरक्षा पुरवते. त्याचप्रमाणे त्याने नुकतेच सामाजिक कार्याचा वारसा जोपासला असून अनेक सामाजिक कार्यात तो भाग घेताना नेहमीच दिसत असतो.
सलमान खानचा दीर्घकाळ बॉडीगार्ड असलेल्या शेराने दोन वर्षांपूर्वी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तुम्हाला माहितीये का? गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी आहे श्रद्धा कपूरचं खास नातं