Saturday, July 6, 2024

‘देसी क्वीन’ सपना चौधरीचं ३ वर्षांपूर्वीचं हरियाणवी गाणं चांगलंच गाजतंय, मिळालेत १६ कोटींपेक्षाही अधिक हिट्स

आज सपना चौधरीचे चाहते फक्त हरियाणापुरतेच मर्यादित नाहीत, तर तिचा डान्स पाहण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून प्रेक्षक येत असतात. जेव्हा सपना तिचा डान्स दाखवते, तेव्हा ती प्रेक्षकांनाही तिच्या तालावर नाचायला भाग पाडते. आज सपनाच्या डान्सचे कोट्यवधीचे चाहते आहेत. स्टेजवर तिचा डान्स पाहण्यासाठी हजारो लोक जमतात. आता ‘तू चीज लाजवाब’ या हरियाणवी गाण्यावरील अभिनेत्री सपना चौधरीचा डान्स व्हिडिओ पुन्हा एकदा चांगलंच गाजत आहे.

हे गाणे सपना आणि प्रदीप यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. गाण्यात दोघांमधील रुसवा-फुगवा दाखवण्यात आला आहे. हे गाणे राजू पंजाबी याने गायले होते. हे गाणे यूट्यूबवर आतापर्यंत १६ कोटींहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. या गाण्यात सपना चौधरीचा डान्स आणि तिच्या अदा अगदी पाहण्यासारख्या आहेत. तसेच, हे गाणे ३ वर्षांपूर्वी २३ जानेवारी, २०१७ रोजी रिलीझ झाले होते आणि ते येताच हिटही झाले होते.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

नुकतेच सपना चौधरीचे नवीन हरियाणवी गाणे यूट्यूबवर रिलीझ होताच व्हायरल झाले. ‘देसी बहू’ असे या गाण्याचे नाव आहे. तिने तिच्या अदांनी सर्वांची मने जिंकली आहेत. केवळ हरियाणामध्येच नव्हे, तर हे गाणे सर्वत्र ऐकले आणि पाहिले जात आहे. या ताज्या हरियाणवी गाण्यातील देसी क्वीनच्या अदा चाहत्यांना भुरळ पाडत आहे.

सोशल मीडियावर लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या, सपना चौधरीने नुकतेच सांगितले की, तिचे हृदय कसे तुटले. वास्तविक, सपनाने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मीट ब्रोज आणि कनिका कपूरचे हिट राजस्थानी गाणे ‘ठाड़े रहियो’वर जबरदस्त ठुमके लावताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कमालच! भोजपुरी स्टार ऋचा दीक्षित आणि प्रवेश लालने केला ‘काली नागिन के जैसी…’ गाण्यावर रोमान्स

-कोरोनामुळे स्टेज शो न करणाऱ्या खेसारी लाल यादवच्या गाण्याचा नवा विक्रम, दोन दिवसांतच मिळाले २० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा

हे देखील वाचा