Thursday, April 18, 2024

जेलमध्ये हलवा-पुरी देऊन एल्विशचं स्वागत! युजर्स म्हणाले, ‘सिस्टम’ तिथेही चालू आहे’

अखेर 135 दिवसांनंतर बिग बॉस विजेता एल्विश यादवची (Elvish Yadav) यंत्रणा हँग झाली. सर्व प्रयत्न करून आणि वकिलांची फौज असतानाही नोएडा पोलिसांनी एल्विश यादवला रविवारी अटक केली. एल्विशविरोधात वन्यजीव कायद्याव्यतिरिक्त एनडीपीएस कायद्याची कलमे वाढवण्यात आली आहेत. अशातच बातम्या येत आहेत की, तुरुंगात गेल्यानंतर पहिल्या रात्री एल्विशला हलवा पुरी खायला देण्यात आली होती.

यूट्यूबर आणि बिग बॉस OTT 2 विजेता एल्विश यादवला शनिवारी नोएडा आणि गुरुग्राममधील रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याबद्दल अटक करण्यात आली आणि रविवारी त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. आणि आता नवीन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की जेलमध्ये त्याच्या पहिल्या रात्री त्याला हलवा पुरीचे स्वादिष्ट जेवण देण्यात आले होते.

सापाच्या विष प्रकरणी एल्विशला रविवारी दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला 14 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली. तुरुंग अधीक्षक अरुण प्रताप सिंग यांनी सांगितले की, त्यांना जेलमध्ये रात्रीच्या जेवणासाठी हलवा, पुरी आणि भाज्या दिल्या गेल्या आणि नियमानुसार वापरण्यासाठी तीन ब्लँकेटही देण्यात आले.

सध्या, एल्विशला क्वारंटाइन बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे. लवकरच त्याला सामान्य बॅरेकमध्ये हलवले जाईल. एल्विश सापाच्या विष प्रकरणात त्याच्यावरील आरोप नाकारत होता. आता तो रेव्ह पार्ट्यांमध्ये पुरवल्याची कबुली दिली आहे.

135 दिवसांनंतर आचारसंहिता लागू होताच. पोलिसांनी एल्विशला पकडले. सापाच्या विषाच्या पुरवठ्यात एल्विशचे नाव समोर आल्यानंतर हे प्रकरण हायप्रोफाईल बनले आणि चर्चेत आले. पोलिसांनी त्याला नोव्हेंबरमध्ये नोटीस पाठवली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

वीर सावरकरांच्या नातवाने केले रणदीपचे कौतुक; म्हणाले, ‘या चित्रपटासाठी त्याने खूप मेहनत केली’
शिल्पा शेट्टीचे नवे स्टाईल स्टेटमेंट, थ्री पीस ड्रेसमधील फोटो व्हायरल

हे देखील वाचा