रणदीप हुड्डा (Randeep Hudda) त्याच्या आगामी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, जो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढली आहे. रणदीप त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. सावरकरांसाठीही त्याने खूप मेहनत घेतली आहे, हे ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसत आहे. सध्या अभिनेता या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी रणदीप हुडाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, “माझी रणदीप हुड्डासोबत अनेकवेळा चर्चा झाली. या चित्रपटासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्याने 30 किलो वजन कमी केले आहे. मी हा चित्रपट पाहिला नाही, पण मला खात्री आहे की, तो चांगला असेल. चित्रपट हे एक असे माध्यम आहे ज्याद्वारे इतिहास नव्या पिढीपर्यंत नेता येईल. मला आशा आहे की त्याच्यावर आणि इतर क्रांतिकारकांवर आणखी चित्रपट बनवले जातील…”
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’मध्ये सावरकरांच्या जीवनातील न ऐकलेल्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. हा चित्रपट 22 मार्चला हिंदी आणि मराठीत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नुकताच निर्मात्यांनी या चित्रपटाचा नवा प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट लोकांच्या अपेक्षांवर खरा उतरतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
करीना कपूर खान ‘क्रू’साठी खूप उत्साहित; म्हणाली, ‘मला नेहमीच तब्बूसोबत काम करायचे होते’
श्रीदेवीची आठवण काढत बोनी कपूर भावूक; म्हणाले, ‘वाईट काळात माझी पत्नी माझ्यासोबत उभी राहिली’