प्रसिद्ध यूट्यूबर गौरव तनेजा (Gaurav Taneja) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी नोएडा येथील मेट्रो स्टेशनवर गेल्यावर त्याला अटक करण्यात आली होती. त्याचवेळी आता त्याच्या चार वर्षांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गौरव तनेजाने दिल्ली पोलिसांकडे फोनवरून धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. युट्युबरने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती शेअर केली आहे.
खरं तर, गौरव तनेजा एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे आणि त्याला फ्लाइंग बीस्ट म्हणून ओळखले जाते. अलीकडेच त्याच्या चार वर्षांच्या मुलीला फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गौरव तनेजाने आपल्या ट्विटर हँडलवर पोलिसांना दिलेल्या तक्रारीची प्रत शेअर करत, दिल्ली पोलीस आणि गृह मंत्रालयाला टॅग केले आहे. त्यासोबत त्याने लिहिले की, “आमच्या चार वर्षांच्या मुलीबाबत आम्हाला धमकीचा फोन आला आहे, ज्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.” (youtuber gaurav taneja 4 year old daughter received death threats)
Received a threat call against our 4 yr old daughter.
Police complaint registered.@DelhiPolice @HMOIndia pic.twitter.com/FobjcwjLMd— Gaurav Taneja (@flyingbeast320) July 28, 2022
यापूर्वी ९ जुलै रोजी गौरव तनेजा आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी नोएडाच्या मेट्रो स्टेशनवर पोहोचला होता. त्याच्या पत्नीने सरप्राईज बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. त्यानंतर तेथे मोठी गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली. अशा परिस्थितीत, मेट्रो कर्मचारी आणि प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले, त्यानंतर गौरवला अटक करण्यात आली. मात्र, त्याला लवकरच जामीनही मिळाला.
गौरव तनेजा याचे सोशल मीडियावर फ्लाइंग बीस्ट नावाचे अकाऊंट आहे आणि इंस्टाग्रामवर त्याचे खूप चाहते आहेत. याशिवाय लाखो लोक त्याला यूट्यूबवर फॉलो करतात. गौरव तनेजा याचे ‘फ्लाइंग बीस्ट’, ‘फिट मसल टीव्ही’ आणि ‘रसभरी के पापा’ असे तीन यूट्यूब चॅनल आहेत. त्याचवेळी गौरव आणि त्याची पत्नी स्टार प्लस शो ‘स्मार्ट जोडी’मध्येही दिसले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा