Sunday, May 19, 2024

दुख:द! अभिनेते युसूफ हुसैन काळाच्या पडद्याआड; हंसल मेहता म्हणाले, ‘मी अनाथ झालो…’

अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन झाले आहे. बॉलिवूड आणि टेलिव्हिजनचा प्रसिद्ध चेहरा असलेल्या युसूफ हुसैन यांच्या निधनाची माहिती देताना, दिग्दर्शक हंसल मेहता यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. निर्माता आणि अभिनेता युसूफ हुसैन यांच्या निधनाने हंसल मेहता हादरून गेले आहेत. जड अंत:करणाने ही दुःखद माहिती देत, त्यांनी भावनिक नोट लिहिली आहे. ते म्हणाले की, “मी आज खऱ्या अर्थाने अनाथ झालो आहे. आता आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही.” रात्री उशिरा ३ वाजून ३० मिनिटांनी त्यांनी हे ट्वीट केले आहे.

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी त्यांच्या पोस्टसोबत युसूफ हुसैन यांचा फोटो शेअर करत लिहिले की, “मी ‘शाहिद’चे २ शेड्युल पूर्ण केले होते आणि आम्ही अडचणीत होतो. मी खूप अडचणीत होतो. माझी फिल्ममेकर म्हणून कारकीर्द संपणार होती. मग ते आले आणि म्हणाले माझ्याकडे फिक्स डिपॉझिट आहे. जर ते पैसे तुमच्या अडचणीत कामी आले नाहीत, तर मलाही त्याचा काही उपयोग नाही.”

युसूफ हुसैन यांना आठवत त्यांनी पुढे लिहिले की, “त्यांनी चेकवर सही केली आणि शाहिद पूर्ण झाला. असे होते युसूफ हुसेन. हंसल मेहता यांनी पुढे लिहिले की, “केवळ माझे सासरेच नाही, तर तुम्ही माझ्या वडिलांसारखे होता. आज ते निघून गेला. जेणेकरून ते स्वर्गातील सर्व मुलींना ‘जगातील सर्वात सुंदर मुलगी’ आणि प्रत्येक पुरुषाला ‘सर्वात सुंदर तरुण’ म्हणतील. शेवटी फक्त ‘लव्ह यू लव्ह यू लव्ह यू’ म्हणता येईल.”

 

हंसल मेहता यांनी पुढे लिहिले की, “युसुफ सर, तुमच्या या नव्या आयुष्याचा मी ऋणी आहे. खरंच आज मी अनाथ झालो. आता आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. मला तुमची खूप आठवण येईल. माझी उर्दू खराबच राहील आणि हो लव्ह यू लव्ह यू लव्ह यू.”

युसूफ हुसैन यांची मुलगी सफिना हुसैन हिचे लग्न हंसल मेहतासोबत झाले आहे. युसूफ हुसेन हे हंसल मेहता यांचे सासरे होते. युसुफ साहब यांनी २००२ साली ‘अब के बरस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये यशस्वी कारकीर्द घडवली. यानंतर त्यांनी ‘रोड टू संगम’, ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’, ‘ब्लू ऑर्गन्स’, ‘खोया खोया चांद’, ‘धूम २’, ‘ओह माय गॉड’, ‘क्रिश ३’, ‘विवाह’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. २०१८ मध्ये, ते रिया चक्रवर्ती आणि वरुण मित्रासोबत पुष्पदीप भारद्वाजच्या ‘जलेबी’मध्ये दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कौतुकास्पद! केले गेले पुनीत राजकुमारचे नेत्रदान, वडिलांनी काही वर्षांपूर्वी आख्या कुटुंबासाठी घेतला होता ‘हा’ निर्णय

-किशोर दावर प्रभावित होते अभिजीत भट्टाचार्य, तर ‘या’ कारणामुळे शाहरुख खानसाठी गाणं केलं होतं बंद

-खलनायक बनूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात दलीप ताहिल, शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटाने दिली खरी ओळख

हे देखील वाचा