Tuesday, June 18, 2024

‘जंगली रमीची जाहिरात करून…’, नेटकऱ्याच्या कमेंटला सिद्धार्थ चांदेकरचे रोखठोक उत्तर, म्हणाला…

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ते दोघे सतत सक्रिय असतात. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असातात.

सिद्धार्थ (Siddharth Chandekar) आणि मितालीने (Mitali Mayekar) खूप कमी वेळात एक विशेष जागा निर्मान केली आहे. काही दिवसांपुर्वी त्या दोघांनी त्यांच्या स्पेन, फ्रान्स ट्रीपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पाहूण चाहत्यांनी भन्नाट कमेंट करत आहेत. तर काही नेटकरी या पोस्टवर टिका करत आहेत. मात्र, या टिकेकडे सिद्धार्थने दुर्लक्ष केलेल नाही. सिद्धार्थने या टिकेला जोरदार प्रतिउत्तर दिल आहे.

एका युजरने म्हटले की, “अरे वा, जंगली रमीची जाहिरात करून, फॉरेनला फिरायला भेटते… मजा आहे बाबा.” या कमेंटला प्रतिउत्तर देताना सिद्धार्थ म्हणाला की, “काय करणार भाऊ, तुमच्याइतके मल्टी टॅलेंटेड आम्ही नाही.” एवढ्यावरच न थांबता युजतने पुन्हा एक प्रश्न विचारला आहे. “बस का, इतकं सगळं छान करता, कलाकार उत्तम आहात, फक्त काही पैशांसाठी कशाला तरुणांना चुकीची दिशा देता…” त्यामुळे हि पोस्ट सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, सिद्धार्थ त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तब्बल 7224 किलोमीटर सातासमुद्रापार गेला आहे. सिद्धार्थचा हॅन्स झिमर हा आवडता गायक आहे. त्याच्या कॉन्सर्टला आयुष्यात एकदातरी जावे अशी त्याची इच्छा किंबहुना स्वप्नच होते. आता त्याचे हे स्वप्न सत्यात उतरत आहे.

सिद्धार्थ सोशल मीडियवर नेहमीच सक्रिय असतो. त्याचा 5 लाख 90हजार इतका मोठा चाहता वर्ग आहे. तो नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधताे, ज्यावर चाहते त्याला भरभरून प्रतिसाद देत असतात. (Siddharth Chandekar replied to the netizen’s comment)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
बिकिनी घालून मॉरिशसच्या रस्त्यावर उतरली सुरभी ज्योती, व्हिडिओ पाहून चाहते थक्क
‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व मुलांच्या मनातच नाही तर…’, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा