Friday, August 8, 2025
Home बॉलीवूड नया है यह! झरीन खानने दाखवले ‘डोन्ट रश’चे नवीन व्हर्जन, पाहा अभिनेत्रीचा जबरदस्त व्हिडिओ

नया है यह! झरीन खानने दाखवले ‘डोन्ट रश’चे नवीन व्हर्जन, पाहा अभिनेत्रीचा जबरदस्त व्हिडिओ

अभिनेत्री झरीन खान बॉलिवूडसोबतच पंजाबी इंडस्ट्रीमध्येही धमाकेदार कामगिरी करत आहे. याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावर तिच्या फोटो व व्हिडिओंद्वारे चाहत्यांची मने जिंकतानाही दिसते. झरीन खानने नुकताच स्वत: चा एक जिममधील व्हिडिओ शेअर केला आहे. यासह तिने ‘डोन्ट रश’चे नवीन व्हर्जनही शोधून काढले आहे. झरीन या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट्स करताना, तसेच चाहत्यांना फिटनेसचे महत्त्व सांगतानाही दिसत आहे.

झरीन खानचा हा व्हिडिओ पाहून सहज अंदाज लावता येऊ शकतो की, ती फिटनेसबद्दल किती जागरूक आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे, “आता हे माझे ‘डोन्ट रश’ व्हर्जन आहे. तुमचे काय आहे.” झरीन खानच्या या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले असून, चाहतेही यावर बरीच प्रतिक्रिया देत आहेत.

झरीन खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच प्रिन्स नरुलासोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तिच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे म्हटले, तर तिने ‘वीर’ चित्रपटाद्वारे 2010 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या व्यतिरिक्त झरीन खान ‘1921’ या हॉरर चित्रपटातही दिसली होती, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा फडकवू शकला नाही.

इतकेच नाही, तर 2017 मध्ये आलेल्या तिच्या ‘अकसर 2’ लाही बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. बॉलिवूड व्यतिरिक्त या अभिनेत्रीने तेलुगु आणि पंजाबी सिनेमांमध्येही आपले नशीब आजमावले आहे. ती अखेर अभिनेता गिप्पी ग्रेवालसोबत पंजाबी चित्रपट ‘डाका’ मध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनेक रात्र रस्त्यांवर उपाशी काढलेला रेमो, आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर, वाचा त्याची संघर्षमय कहाणी

-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग

-‘हम युपी से है भैया!’ उत्तर प्रदेशातील असे कलाकार, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय बॉलीवूडचं पानही हलत नाही

हे देखील वाचा