×

झरीन खानच्या आईची प्रकृती खालावली, करण्यात आले आयसीयूमध्ये दाखल

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानला (Zareen Khan) मोठा धक्का बसला असून, तिच्या आईला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर चाहत्यांना आईच्या प्रकृतीशी संबंधित अपडेट्स देत एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच तिने चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. ही पोस्ट समोर आल्यानंतर जरीनच्या या पोस्ट नंतर चाहते तिच्या आईसाठी प्रार्थना करत आहेत. 

जरीन खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आईच्या प्रकृतीची माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती म्हणते की, “माझ्या आईची तब्येत पुन्हा बिघडली आहे. काल रात्री तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले. ती सध्या आयसीयूमध्ये दाखल आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे की, माझ्या आईच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा.” तत्पूर्वी गेल्या वर्षीच्या सुरुवातीलाही जरीनच्या आईची तब्येत अचानक बिघडली होती. त्यावेळीही त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यादरम्यान त्यांना महिनाभराहून अधिक काळ रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. याकाळात जरीन खानला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. यानंतर तिच्या आईची प्रकृती सतत बरी नसते.

दरम्यान जरीन खानने २०१० मध्ये सलमान खानसोबत ‘वीर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सलमान असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू निर्माण करण्यात अपयशी ठरला असला तरी, याने जरीनसाठी चांगलाच लाभदायी ठरला. जरीन तिच्या यशाचे श्रेय नेहमीच सलमान खानला देत असते. कारण त्यानेच तिला फिल्म इंडस्ट्रीत लॉन्च केले होते. जरीन खानने ‘वीर’, ‘अक्सर २’, ‘हेट स्टोरी ३’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post