×

खरंच की काय! या निर्मात्याला डेट करतेय अवनीत कौर, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

टेलिव्हिजन अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमी नवनवीन फोटो शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात असते. त्यामुळेच तिच्या नावाची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत असते. ‘चंद्र नंदिनी’मध्ये ‘चारुमती’ आणि ‘अलादीन’मध्ये ‘राजकुमारी यास्मिन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवनीतने वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात केली. सध्या ती तिच्या लव्ह लाईफमुळे सर्वत्र चर्चेत आली आहे.

अवनीत कौर सध्या तिच्या प्रेमप्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. जेव्हापासून अवनीत ‘अलादीन’मध्ये ‘राजकुमारी यास्मिन’च्या भूमिकेत दिसली, तेव्हापासून कार्यक्रमातील मुख्य अभिनेता सिद्धार्थ निगमसोबतची (Siddharth Nigam) तिची केमिस्ट्री खूप चर्चेत होती. दोघांच्याही प्रेमप्रकरणची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र या दोघांनीही या बातम्यांना महत्व न देता आमच्यामध्ये फक्त मैत्रीचे नाते असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र माध्यमांमधील चर्चांनुसार अवनीत कौर निर्माता राघव शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनीही आपलं नातं त्यांच्या प्रोफेशनमुळे लपवलं आहे.

अवनीत आणि राघव एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतात आणि दोघेही ३ ते ४ वर्षांपूर्वी एकमेकांना भेटले होते. दोघांची भेट झाली. पूर्वी राघवचे अवनीतवर प्रेम होते आणि तो बराच काळ अवनीतच्या मागे लागला होता. मात्र, त्यांच्या प्रोफेशनमुळे दोघेही त्यांचे नाते उघड करत नाहीत. राघव एका प्रॉडक्शन हाऊसशी (म्युझिक लेबल कंपनी) संबंधित आहे आणि अवनीतने या बॅनरखाली अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे.

दरम्यान अवनीत मुंबईत आणि राघव दिल्लीत राहत असल्याने दोघे अनेकदा एकमेकांना भेटायला जातात, अशीही माहिती समोर आली आहे. जरी अवनीत आणि राघव यांनी अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नसले, तरी अवनीतने अलीकडेच तिच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपट ‘टिकू वेड्स शेरू’ मधील काही फोटोपोस्ट केल्याने ती चर्चेत आली होती. या चित्रपटात अवनीत नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post