×

जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशननंतर अभिनेता जायद खान करणार, चित्रपटांमध्ये पुनरागमन

अभिनेता जायद खान मागील बऱ्याच वर्षांपासून चित्रपटांमधून गायब आहे. अनेक फ्लॉप सिनेमे देणाऱ्या जायदने काही हिट चित्रपटांमध्ये सहायक भूमिका साकारत लोकप्रियता मिळवली. जायद हा चित्रपटांसोबतच लोकांच्या चर्चांमधून देखील गायब झाला. असे असून मग तुम्हाला वाटत असेल की अचानक आज जायद चर्चेत येण्याचे कारण काय? झाले असे की नुकतीच जायदने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, त्याच पोस्टमुळे जायद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

जायदने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये त्याचे कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन दिसून येत असल्यामुळे सध्या जायद गाजताना दिसत आहे. जायदने शेअर केलेल्या त्याच्या फोटोंमध्ये त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनची जर्नी देखील स्पष्ट केली आहे. त्याने या पोस्टमधून त्याचा गुरु आणि अभिनेता ऋतिक रोशनला देखील धन्यवाद म्हटले आहे. एका माहिती नुसार लवकरच जायद चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. जायदने त्याच्या बदललेल्या लूकमधले फोटो शेअर करत एक मोठी पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by ZAYED KHAN (@itszayedkhan)

जायद खानने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अखेर मी एक अभिनेता म्ह्णून माझा प्रवास एका पुढच्या पातळीवर नेत आहे. नमस्कार मित्रांनो, याला खूपच वेळ लागला मात्र सौदेबाजीने मला आत्मविश्वास, कठोर मेहनत, फोकस यांबद्दल भरपूर शिकवले आणि प्रेम यासर्व रूपांमध्ये आहे. आज मी तुम्हाला या प्रवासाचे काही सुंदर फोटो शेअर करत आहे. या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रवासादरम्यान माझ्याकडे अनेक लोकांना धन्यवाद म्हणायचे आहे. माझी पत्नी मलायका, आईवडील संजय खान, जरीन खान, माझ्या बहिणी फराह खान अली, सुजैन खान, सिमोन आणि अगदी भावासारखा असणारा ऋतिक रोशन आणि सर्वात शेवट माझी मुलं जिदान आणि आरिज अदिती सर्वानाच धन्यवाद म्हणतो. माझ्या या प्रवासात या सर्वानी महत्वाची भूमिका बजावली.”

तत्पूर्वी जायद खान हा अभिनेते आणि दिग्दर्शक संजय खान यांचा मुलगा असून संजय खान यांनी अनेक टीव्ही शोचे दिग्दर्शन केले होते. टिपू सुलतान, जय हनुमान आदी मालिकांचा त्यात समावेश आहे. जायद खानने २००३ साली ‘चुरा लिया है तुमने’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याला २००४ साली आलेल्या फारच खानच्या ‘मैं हू ना’ मधून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने दस, युवराज, अंजाना अंजानी, ब्लू आदी चित्रपटांमध्ये काम केले, मात्र हे सर्व सिनेमे फ्लॉप झाले. आता जायद एवढ्या वर्षांनी कोणत्या सिनेमात पदार्पण करणार हे लवकरच समजेल.

हेही वाचा-

Latest Post