दैनंदिन जीवनातील विरंगुळा घालवण्यासाठी प्रेक्षकांची पहिली पसंत आहे टीव्ही मालिका. चित्रपटांइतकेच मालिकांना देखील महत्व आहे. टीव्ही चॅनल सतत प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या मालिका घेऊन येतात. लव्हस्टोरी, घरगुती भांडणं या सर्वांव्यतिरिक्त रहस्यमयी आणि थरारक अशा मालिकांना प्रेक्षकांची खास पसंती मिळते. सध्या मराठी टीव्ही जगतात अशा अनेक मालिका आहेत, मात्र हॉरर मालिकांची बातच काही और आहे!
आगामी काळात अशीच एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी चॅनलवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेचे नाव आहे ‘ती परत आलीये’. नावातच इतकं रहस्य आहे, तर मालिकेत किती असेल. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीझ झाला आहे. झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून याचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
या प्रोमोमध्ये दृश्यही थरारक दाखवलं गेलंय, जे पाहून प्रेक्षक मालिकेसाठी खूप उत्सुक झाले आहेत. या एका मिनिटाच्या प्रोमो व्हिडिओला आतापर्यंत तब्बल १ लाख ७६ हजारहूनही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच युजर्स यावर कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याच्याच जागी ही नवीन गूढ रहस्यमय मालिका येणार आहे. ही मालिका १६ ऑगस्ट पासून रात्री १०.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच प्रेक्षक या मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोची वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस
-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट