Monday, July 1, 2024

‘मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय…’, मराठी दिग्दर्शकाने केलेलं ‘ते’ ट्वीट व्हायरल

गेल्या कित्येत वर्षापासून मराठा आरक्षण हा मद्दा देशात सातत्याने तोंडवर काढत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाव यासाठी अनेक नेतेमंडळी काम करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू ठेवले आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावत असल्याने राज्यभरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने आंदोलनकर्त्यांना आक्रमक होऊ नये असे आवाहन केले आहे.

बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये सोमवारी (30 ऑक्टोबर) या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. या हिंसाचारात अनेक वाहने जळून खाक झाल्या आहेत. या आंदोलनावर अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ढोमे यांच्या या प्रतिक्रियेला मराठा (Maratha Reservation) समाजातून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. अनेकांनी त्यांना धन्यवाद दिले आहे. या आंदोलनामुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सरकारने या आंदोलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे.

झिम्मा चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेने यांनी ट्विट करताना लिहिले की, “आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय.. मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय… त्यांच्या नाय्य मागणीचा विचार झाला पाहिजे! सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये! जय शिवराय!”

त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. अनेकांनी या ट्विटवर रिट्विट केले आहे. यावर ट्विट करताना एकाने लिहिले की,”या विषयावर तुम्ही बोलले त्याबद्दल हेमंत दादा तुमचे मनापासून धन्यवाद.” दरम्यान, अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे नेहमीच सामाजिक मुद्द्यांवर आपले मत मांडत असतात. सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्याने चांगलाच जोर धरला आहे. यावर अनेक सेलिब्रेटींनी मत मांडले आहे.  (Zimma fame director tweet about Manoj Jarange Patal protest)

आधिक वाचा-
अंगद बेदीने 400 मीटर शर्यतीत जिंकले सुवर्णपदक, नेहा धुपियाने असे केले स्वागत व्हिडीओ व्हायरल
‘शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये प्रेक्षकांसाठी मेजवानी, चित्रपटात झळकणार सोनाली कुलकर्णीचे खरे आई-बाबा

हे देखील वाचा