Friday, December 1, 2023

‘मराठा आरक्षण आणि लाठीचार्ज…का? कशासाठी?’, जालना लाठीचार्ज प्रकरणी मराठमोळी अभिनेत्री संतापली

गेल्या कित्येक वर्षांनपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोक अनेक ठिकाणी उपोषन करत आहेत. आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी यावरूम मोठ-मोठे गोंधळ होत आहेत. यादरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण चालू होते. अनेक लोक एकत्र येत आहेत. पण जालणन्यात उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

ही घटण शुक्रवारी घडली आहे. यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिए सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो काही वेळातच प्रचंड व्हायरल होता. अश्विनीच्या पोस्टवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत असतात.

अश्विनी विविध विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातूल मत मांडत असते. नुकतीच अश्विनीने एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. पोस्ट शेअर करताना अश्विनीने लिहिले की, “मराठा आरक्षण आणि लाठीचार्ज…का? कशासाठी?” यावरू सोशल मीडियाावर चांगलाच गोंधळ उडाला आहे.

झालं असं की, गेल्या 29 ऑगस्टपासून मराठा मार्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. यावेळी आनरण उपोषण करण्यात आले. त्या आंदोलनातून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पण त्याला विरोध झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. तर तेव्हा पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार केला. आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत 11 ते 12 पोलिस जखमी झाले आहेत.

आंदोनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस शांत करण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य खूप निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्र्यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल. असा इशारा देण्यात आला आहे. (Actress Ashwini Mahangde of ‘Ai Khe Kay Karte’ fame also gave her reaction on the Jalna lathicharge case)

अधिक वाचा-
अभिनेता आर.माधवनची FTIIच्या अध्यक्षपदी नियुक्ती; अनुराग ठाकुर ट्विट करत म्हणाले…
‘माझ्या मुलीकडे बघताना लोकांची लाळ गळत होती आणि…’, अतिशा नाईक यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

हे देखील वाचा