रश्मी देसाई आणि अभिजीत बिचुकले झाले ‘तिकीट टू फिनाले’मधून बाहेर, घरातील सदस्यांनी दिला निर्णय


बिग बॉस १५‘ चा ग्रँड फिनालेला आता केवळ दोन आठवडे राहिले आहेत. त्यामुळे आता सगळे सदस्य त्यांचा खेळ खेळत आहेत. घरातील सदस्यांना बिग बॉसने दोन वेळा ‘तिकीट टू फिनाले’ टास्क दिला होता. परंतु सदस्यांमुळे हा टास्क दोन वेळा रद्द झाला. आता पुन्हा एकदा हा टास्क देण्यात आला आहे. परंतु घरातील सदस्यांनी पुन्हा एकदा या संधीची माती केली आहे आणि ही संधी घालवली आहे. कोणता सदस्य बिग बॉस फिनालेचा हिस्सा असणार नाही, हे ठरवण्याची जबाबदारी बिग बॉसने घरातील सदस्यांना दिली.

बिग बॉसने सगळ्यांना आदेश दिला की, अशा एका सदस्याला निवडा जो फिनालेमध्ये जाणार नाही. त्यामुळे आता सगळेच एकमेकांची नावे कमी करण्याचा प्रयत्न करत होते. घरातील जास्त करून स्पर्धकांनी रश्मी देसाई आणि अभिजीत बिचुकले यांची नावे घेतली. परंतु सगळ्यांनी याला होकार दर्शवला नाही आणि बहुमत झाले नाही. (bigg boss 15 umar riaz, karan kundra, rashmi desai, pratik sehajpal and these contstent out from the ticket to finale race)

घरातील सदस्य एकमताने निर्णय घेऊ शकत नाही, हे जेव्हा बिग बॉसला जाणवले तेव्हा ते खूप नाराज झाले. यावेळी बिग बॉसने घरातील सदस्यांना दुसरा चान्स दिला नाही आणि अभिजीत आणि रश्मी यांना ‘तिकीट टू फिनाले’मधून बाहेर केले. त्यामुळे आता केवळ ७ स्पर्धक यासाठी पात्र आहेत. यावेळी बिग बॉसने हे स्पष्ट केले होते की, यासाठी केवळ घरातील स्पर्धक जबाबदार आहेत कारण ते एकमताने निर्णय घेण्यास अपात्र ठरले आहेत.

बिग बॉसने ही जबाबदारी जेव्हा घरातील स्पर्धकांवर दिली तेव्हा सगळ्यांनी दोन टीम पाडल्या. एका टीममध्ये शमिता शेट्टी, देवोलिना भट्टाचार्जी, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल होते तर दुसऱ्या टीममध्ये कारण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश आणि उमर रियाज होते. यावेळी करण आणि रियाज यांचे खूप नुकसान झाले कारण त्यांच्या टीममध्ये खूप कमी सदस्य होते.

यावेळी बिग बॉसमध्ये सदस्यांना स्नोमॅन बनवण्याचा टास्क होता. यात पहिल्या राउंडमध्ये शमिताची टीम जिंकली. यावेळी प्रतीक सहपालने सर्वात आधी जाऊन उमर रियाज याला फिनालेच्या रेसमधून बाहेर केले. दुसऱ्या राउंडमध्ये करण कुंद्राची टीम जिंकली आणि तेजस्वी आणि प्रतीकला बाहेर केले. तिसऱ्या राउंडमध्ये शमिताची टीम जिंकली आणि शमिताने करणला या गेममधून बाहेर केले. करण, उमर, प्रतीक हा टास्क हारले आहेत.

हेही वाचा  :

‘राजनीती’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या बरखा बिष्टने बंगाली चित्रपटसृष्टी देखील कमावले आहे नाव, जाणून घ्या माहिती

फॅशनबाबत करण जोहर देतोय रणवीर सिंगला टक्कर, पॅराशूट ड्रेसमधील लूक आला समोर

शहनाझ गिलच्या वडिलांवर झाला दुचाकीवरून हल्ला, पोलिसांनी केलीय कडक तपासणी सुरू

 


Latest Post

error: Content is protected !!