Tuesday, July 9, 2024

विधू विनोद चोप्राच्या मुलाने मणिपूरमधून क्रिकेटमध्ये केले पदार्पण, पहिल्याच सामन्यात केले शतक

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ’12वी फेल’ चित्रपटाचे यश साजरे करत आहेत. त्यांच्यासाठी आनंदाची दुसरी संधीही आली आहे. दिग्दर्शकाचा मुलगा अग्नीने क्रिकेटच्या खेळात कमाल केली आहे. अग्निने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार पदार्पण केले आहे. सिक्कीमविरुद्ध खेळताना त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले.

रणजी ट्रॉफीमध्ये मिझोरामकडून खेळताना अग्नि चोप्राने हा पराक्रम केला. मिझोरामला विजयाची नोंद करता आली नसली तरी अग्नि चोप्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. अग्निने रणजी सामन्यात एकूण 258 धावा केल्या. अग्नी हा दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आणि अनुपमा चोप्रा यांचा मुलगा आहे.

अग्नीने मिझोरामकडून खेळताना सिक्कीमविरुद्धच्या पहिल्या डावात १७९ चेंडूत १६६ धावांची शानदार खेळी खेळून आपली क्रिकेट प्रतिभा सिद्ध केली. अग्नीने आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवत दुसऱ्या डावात 74 चेंडूत 92 धावा केल्या. सिक्कीमच्या पहिल्या डावातील 442/9 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना, मिझोरामने पहिल्या डावात केवळ 214 धावा केल्या, त्यापैकी 75 टक्क्यांहून अधिक धावा अग्नीने केल्या.

२५ वर्षीय अग्नी हा डाव्या हाताचा फलंदाज आहे. अग्नि चोप्राने मुंबईच्या ज्युनियर संघातून आपल्या करिअरची सुरुवात केली. नंतर तो मिझोरामच्या दिशेने वळला. सय्यद मुश्ताकसाठी पदार्पण केल्यानंतर, त्याने एका महिन्यानंतर चंदीगडविरुद्ध विजय हजारे ट्रॉफीमध्ये लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. आता रणजी ट्रॉफीमध्ये अग्निने पहिल्याच सामन्यात शतक झळकावून शानदार सुरुवात केली आहे.

विधू विनोद चोप्रा बद्दल बोलायचे झाले तर, ’12वी फेल’ च्या आधी त्याने पीके, मुन्ना भाई एमबीबीएस, शिकारा, मिशन कश्मीर आणि संजू सारखे प्रसिद्ध चित्रपट केले आहेत. गेल्या वर्षी त्याने अत्यंत कमी बजेटमध्ये ’12वी’ बनवली, जी बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजली. यामध्ये विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत दिसला होता. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन 53.88 कोटी रुपये आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हिंदीत देखील साॅलिड ओपनिंगला ‘हनुमान’ तयार, व्हिज्युअलची होतेय वाह वा
Prabha Atre Death | ‘या’ कारणामुळे आज नाही तर सोमवारी होणार प्रभा अत्रे यांच्यावर अंतिम संस्कार, मोठी माहिती आली समोर

हे देखील वाचा