Monday, April 15, 2024

हिंदीत देखील साॅलिड ओपनिंगला ‘हनुमान’ तयार, व्हिज्युअलची होतेय वाह वाह

हा शुक्रवार प्रेक्षकांसाठी अनेक नवीन आणि एक्साइटिंग चित्रपट घेऊन आला आहे, बाॅलीवूडमधुन विजय सेतुपती आणि कॅटरीनाचा ‘मेरी क्रिसमस’ काल प्रदर्शित झाला आहे. तर साउथचे देखील अनेक मोठे चित्रपट काल प्रदर्शित झाले आहेत. यात धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ आणि महेश बाबूचा (Mahesh Babu) ‘गूंटूर कारम’ याचाही समावेश होता. परंतु या सर्वांत एक सिनेमा जो लोकांना चकीत करत आहे तो म्हणजे तेलुगू इंडस्ट्रीमधला(Telugu Industry) ‘हनुमान’.

तेजा सज्जाचा ‘हनुमान’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे, चित्रपटाचा फस्ट लुक आउट झाल्यापासुनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. याच्या हिंदी ट्रेलरला देखील चांगलाच प्रतिसाद मिळाला होता, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची खुपच वाह वाह होत आहे. हिंदीत देखील या चित्रपटाची जोरदार ओपनिंग होतानाचे चित्र दिसत आहे.

तेजा सज्जा स्टारर ‘हनुमान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केले आहे, जो भारतीय पौराणिक कथांवर आधारित संपूर्ण युनिव्हर्सची निर्मिती करत आहे. VFX चा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेलेला हा चित्रपट अगदीच कमी बजेटमध्ये बनवण्यात आला आहे, तो 30 कोटी रुपयांमध्ये बनवुन तयार झाल्याच काही रिपोर्ट सांगतात. परंतू अत्यंत मर्यादित बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे. ‘हनुमान’च्या हिंदी ट्रेलरलाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता तो बॉक्स ऑफिसवरही दमदार ओपनिंगसाठी सज्ज असल्याचं दिसत आहे.

‘हनुमान’ला हिंदीत मिळतेय चांगलीच ऍडवान्स बुकिंग

अत्यंत कमी प्रमोशन आणि प्रसिद्धीसोबत येणारे ‘हनुमान’चे हिंदी व्हर्जनही लोकांना एक्साइट करण्यात यशस्वी होताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, हिंदीतील ‘हनुमान’च्या पहिल्या दिवसासाठी 64 हजारांहून अधिक तिकिटे ऍडवान्स बुक करण्यात आली होती. या बुकिंगमधून, चित्रपटाने 1.5 कोटी रुपयांच्या आसपास ऍडव्हान्स कलेक्शन केले आहे.

लिमिटेड स्क्रीनवरच रिलीज झाले ‘हनुमान’चे हिंदी व्हर्जन

‘हनुमान’चे(Hanuman) हिंदी व्हर्जन लिमिटेड स्क्रीनवर रिलीज होणार आहे. ऍडव्हान्स बुकिंगनुसार,लिमिटेड स्क्रीनवर रिलीज झालेल्या ‘हनुमान’चे हिंदी व्हर्जन पहिल्याच दिवशी 2-3 कोटी रुपये कमवू शकते. चित्रपटाच्या लिमिटेड स्क्रीनचा विचार केला तर हा आकडा खूपच चांगला आहे. पण ‘हनुमान’ला पुढे नेणारी गोष्ट म्हणजे हिंदी प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, ज्यामुळे शनिवार-रविवारच्या कमाईत मोठी वाढ होणार आहे.

‘हनुमान’ ला मिळतंय जनतेचं प्रेम

सोशल मीडियावर ‘हनुमान’ पाहणारे लोक त्याचे कौतुक करत आहेत. अनेक यूजर्स या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला ‘ब्रिलियंट’ म्हणत आहेत, तर अनेकजण ‘३० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये शानदार व्हिज्युअल’ असलेल्या या चित्रपटाने इंप्रेस झाले आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा तेलुगु भाषेतील डब केलेला चित्रपट आहे असे मला वाटलेच नाही कारण हा अनुभव खूपच कमालीचा होता.’

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर, ट्रेड ऍनालिसिस तरण आदर्शने चित्रपटाला ‘आकर्षक’ असे म्हणत लिहिले की तो हा चित्रपट साॅलिड एटरटेनर आहे . त्यांनी चित्रपटाच्या VFX, हिंदी डबिंग आणि अभिनयाचेही कौतुक केले. आणखी एक ट्रेड ऍनालिस्ट रमेश बाला यांनीही चित्रपटाच्या व्हिज्युअल आणि प्रोडक्शन व्हॅल्यूजचे कौतुक केले. ‘अंगावर शहारा आणणारा आणि हैराण करणारा ‘ चित्रपट बनवल्याबद्दल त्यांनी दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांचेही अभिनंदन केले.

सोशल मीडियावर ‘हनुमान’ला ज्याप्रकारे लोकांकडून रिस्पाॅन्स मिळत आहे, शुक्रवारी संध्याकाळपासूनच शोमधली गर्दी चांगलीच वाढणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनामुळे निर्माण झालेल्या पाॅजिटीव वातावरणाचा चित्रपटाला फायदा होईल.तेजा सज्जा एका इंटरव्ह्यू मध्ये असा म्हणाला होता की, मी उत्तर भारतात या चित्रपटाचे प्रोमोशन केले नाही कारण, उत्तर भारतातील लोक माझा चेहरा देखील ओळखत नाहीत. परंतू हनुमानचं कौतुक तेजा सज्जला त्या दिशेने घेऊन जात आहेत जिथे ऑडियन्स कार्तिकेयच्या निखील सिद्धार्थ(Nikhil Sidhharth) आणि कांताराच्या ऋषभ शेट्टी(Rushabh Shetty) सारखेच तेजा सज्जला(Teja Sajja) देखील ओळखायला लागतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Prabha Atre Death | ‘या’ कारणामुळे आज नाही तर सोमवारी होणार प्रभा अत्रे यांच्यावर अंतिम संस्कार, मोठी माहिती आली समोर
धनुषचा कॅप्टन मिलर पडला सगळ्यांवर भारी, पहिल्याच दिवशी केली ‘एवढी’ कमाई

हे देखील वाचा